फोटो : देमचोकमध्ये काही दिवसांपूर्वी चीनी सैन्याने घुसखोरी केली. त्यानंतर भारतीय नागरिकांनी तिरंगा घेऊन त्यांना अडवले होते.
नवी दिल्ली - चीनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर प्रत्यक्ष सीमा रेषेवरील (एलएसी) लडाखच्या चुमारमध्ये चीनचे सुमारे एक हजार आणि तेवढेच भारतीय सैनिक आहेत. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली पाहता भारताने सीमेवर आणखी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पिपल्स लिबरेशन आर्मी (चीनचे जवान) ला प्रादेशिक युद्ध जिंकण्यासाटी तयार राहा आणि युद्ध क्षमतांमध्ये वाढ करा, असा आदेश दिला आङे. त्यामुळे तिनपिंग यांच्या या वक्तव्यानंतर वाद अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
भारतीय सैनिकांना का घ्यावी लागली माघार?
गृह मंत्रालयातील सुत्रांच्या मते, गेल्या काही दिवसांत चीनी सैनिक अधिकच हिंसक बनले आहेत. तीन दिवसांपूर्वी पीएलएच्या जवानांनी चुमारच्या आठ पॉइंट्सवर भारतीय सैनिकांना सुमारे तीन किलोमीटर मागे सारले होते. सरकारच्या एका ज्येष्ठ अधिका-याच्या मते,
आपले सैनिकही चीनी सैनिकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सीमेवर कडक पहारा देत आहेत. पण धोरणात्मक कारणांमुळे भारतीय सैनिकांना मागे सरकावे लागले आहे. कारण त्यावेळी चीनी जवानांची संख्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होती. त्यानंतर भारताकडून अधिकचे सैन्य पाठवण्यात आले त्यानंतर आता भारतीय सैनिक पुन्हा आपल्या पोझिशनवर आहेत.
सरकारच्या एका अधिका-याच्या मते, आता माघार कोण घेणार यावर सर्व अडले आहे. सीमेजवळ भारताने तयार केलेला मार्ग आणि इतर स्ट्रक्चर नष्ट करावे असे चीनचे मत आहे. पण भारत त्यासाठी तयार नाही.
लष्करप्रमुखांचा पहिला परदेश दौरा रद्द
अनेक प्रयत्नांनंतरही सुमारे 14,500 फूट उंचीवर भारतीय आणि चीनचे जवान आपल्या जागी अडून आहेत. ही स्थिती पाहता लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी त्यांचा तीन दिवसीय भूतान दौरा रद्द केला आहे. लष्करप्रमुखांनी सोमवारी अंतिमक्षणी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. जबाबदारी स्वीकारल्यानंतर लष्करप्रमुखांचा हा पहिलाच परदेश दौरा होता.
चीनचा डबल गेम
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन डबल गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहे. चीनी राष्ट्रपतींनी भारतात सीमाप्रश्नी भारतात दिलेले वक्तव्य आणि त्यांच्या जवानांची प्रत्यक्ष क्रिया यात बरीच तफावत आहे. चीनी जवानांनी जिनपिंग यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे शक्यच नाही. विशेष म्हणज, जिनपिंग सेंट्रल मिलिट्री कमिशनचे अध्यक्षही आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारत सीमा वादाशी संबधित छायाचित्रे...