आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latests News In Marathi Sultan Of Brunei Offers $2bn For 3 Sahara Hotels

सहाराच्या 3 हॉटेल खरेदीसाठी ब्रुनोई सुलतानाची 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुरुंगात कैद असलेले सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या तीन हॉटेल्स खरेदी करण्याची तयारी ब्रुनोईच्या सुलतानाने दाखवली आहे. ब्रुनोई सुलतानांशी संबंधीत एका कंपनीने 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर दिली आहे. सहारा समुहाची न्यूयॉर्कमध्ये प्लाजा आणि ड्रीम व अमेरिकेत ग्रोसव्हेनॉर हाउस हॉटेल आहे. ब्रुनोईचे सुलतान हसन्नल बोलकिया हे जगातील मोजक्या श्रीमंतांपैकी एक आहेत. लंडनमध्ये त्यांची रियल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक असून येथेच त्यांची डॉचेस्टर हॉटेल देखील आहे.
सायरस पुनावाला देखील रेसमध्ये
सहारांच्या हॉटेल खरेदी करण्यासाठी जगातील मातब्बरांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यात सायरस पुनावाला यांचाही समावेश आहे. मात्र, पुनावाला यांना सहारांच्या लंडनमधील संपत्तीमध्येच रस आहे.
जामीनासाठीच्या रकमेसाठी संपत्तीची विक्री
सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत न करण्याच्या आरोपात सुब्रतो रॉय यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांना सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जामीनासाठी त्यांना 1.6 बिलिअन अमेरिकन डॉलरची गरज आहे. यासाठी ते तिहार तुरुंगातूनच लंडन आणि अमेरिकेतील त्यांच्या संपत्तीच्या विक्रीची डील करत आहेत. या डीलसाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना आवश्यक सुविधा मंजूर केल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, साहाराची परदेशातील मालमत्ता...