आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Drought : Maharashtra Rejects CM Arvind Kejriwals Help Offer

महाराष्ट्र सरकारने फेटाळली अरविंद केजरीवाल यांच्या मदतीची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल - Divya Marathi
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील लातूर जिल्हा पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसत आहे. मिरजहून रेल्वेने पाणी आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लातूरला दररोज दहा लाख लिटर पाणी पुरवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने केजरीवाल यांच्या मदतीची ही ऑफर फेटाळली आहे.

लातूरमधील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण व्यवस्था केली आहे. दुसर्‍या राज्यांकडून सध्या मदतीची आवश्यकता नसल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लातूरला दररोज दहा लाख लिटर पाणी देण्याची तयारी दर्शवली होती. दिल्लीतून लातूरला पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, असेही केजरीवाल यांनी पत्रात म्हटले होते.

केजरीवालांचे पंतप्रधानांना पत्र...
-लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. संपूर्ण देशाचे लातूरकडे लक्ष लागले आहे. लातूर पाणीप्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतल्याने केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
- दिल्लीकरांनी पुढील दोन महिने रोज 10 लाख लिटर पाणी लातूरला देण्यास तयार आहेत. दिल्लीहून लातूरला पाणी पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार करत असेल तर दिल्ली सरकार तत्काळ पाणी उपलब्ध करून देईल, असे केजरीवाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
- दिल्लीत पाणी तसे कमीच आहे. मात्र, लातूरमधील स्थिती फारच विदारक आहे. लातूरमधील लोकांना मदत करणे आपले कर्तव्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवालांच्या ऑफरला कॉंग्रेस व भाजपचा विरोध
- भाजप व कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या ऑफरला विरोध केला.
- केजरीवाल यांनी आधी दिल्लीतील जनतेसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे भाजप नेते विजेंदर गुप्ता यांनी म्हटले आहे.
- दिल्लीत काही भागातील लोकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे.
- केजरीवाल केव्हा काय करतील हे समजण्याच्या पलिकडे असल्याचे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी म्हटले आहे.

दिल्लीत या भागात आहे पाणी टंचाई....
- पहाडगंज, सदर बाजारर, नरेला, बुराडी, संगम विहार, तुगलकाबाद, देवळी, जामिया, मुनिरका, शाहदरा, दिलशाद गार्डन, करावल नगर, भजनपूरा, द्वारका, राजा गार्डन, नजफगड, पालम

पुढील स्लाइडवर पाहा, केजरीवालांचे पंतप्रधानांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे...