आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलजार यांचा काव्यसंग्रह प्लुटो ग्रहाला समर्पित, 'प्लुटो आणि माझ्या दु:खाची जातकुळी एकच'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रसिद्ध गीतकार, कवी आणि दिग्दर्शक गुलजार यांनी नवा काव्यसंग्रह प्लुटो ग्रहाला समर्पित केला आहे. ‘प्लुटो’ या काव्यसंग्रहाची मध्यवर्ती कल्पना नात्यांवर आधारित आहे. देव, निसर्ग, काळ, कला आणि कवितेशी असलेले गुलजार यांचे नाते विविध रचनांमधून उलगडले आहे.
या कवितांचा इंग्रजी अनुवाद निरुपमा दत्त यांनी केला आहे. हा काव्यसंग्रह हार्परकॉलिन्स इंडियाने प्रकाशित केला आहे. गुलजार यांच्या काव्यसंग्रहात प्रथमच इंग्रजी अनुवाद देण्यात आला आहे. कवीने स्वत: चितारलेले स्केचेस यात आहेत.

प्लुटोची आणि माझ्या दु:खाची जातकुळी एकच : गुलजार
ग्रह म्हणून प्लुटोचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे संशोधकांनी नुकतेच जाहीर केले होते. प्लुटोला नवग्रहांत स्थान न देण्याचा निर्णय संशोधकांनी घेतला. आपल्या ग्रहमंडलाच्या कुटुंबातून त्याचे नाव वजा करण्यात आले. नेमके माझ्या कुटुंबातूनही मला असेच वजा करण्यात आल्याचे गुलजार सांगतात.

१११ अपारंपरिक कविता
या काव्यसंग्रहात छोट्या १११ कविता आहेत. गुलजार यांच्या अनुभवांच्या बिंदूची ती अभिव्यक्ती असल्याचे अनुवादक निरुपमा दत्ता यांनी सांगितले. क्षणांना सहजतेने कवितेत टिपल्याने हे जिवंत अनुभव देत असल्याचे दत्ता म्हणतात.