आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्‍या. गांगुली खोटारडे, योग्‍य वेळी पोलिसांकडे तक्रार करणार- पीडित लॉ इंटर्नचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- लॉ इंटर्नच्‍या लैंगिक शोषणाच्‍या आरोपांप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे माजी न्‍यायाधीश न्‍या. ए. के. गांगुली यांनी सरन्‍यायाधीश पी. सत्‍यशिवम यांन पत्र लिहून स्‍वतःची बाजू मांडली. परंतु, आरोप करणा-या मुलीने न्‍या. गांगुलींचा दावा फेटाळून लावला आहे. ते खोटे बोलत असून योग्‍य वेळेवर पोलिसांकडे तक्रार दाखल करेन, असे तिने स्‍पष्‍ट केले आहे.

पीडित प्रशिक्षणार्थीने 'लिगली इंडिया' या ब्‍लॉगवरुन न्‍या. गांगुली यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढले आहेत. तिने लिहीले आहे, की या प्रकरणात राजकारण करणारे आणि अफवा पसरविणारे लोक जबाबदारी झटकण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. ते कायदेशीर प्रक्रीयेला फाटा फोडण्‍याचाही प्रयत्‍न करत आहेत. मी जे काही केले ते अतिशय जबाबदारीपूर्व आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केले आहे.


गांगुली यांच्‍या पत्रातील मुद्दे खोडून काढताना तिने लिहीले, की घटनेनंतर मी कोलकात्‍याला परतले होते. मी काही शिक्षकांसोबत यासंदर्भात चर्चाही केली. घटना माझ्या प्रशिक्षणदरम्‍यान घडली होती. प्रशिक्षणादरम्‍यान लैंगिक अत्‍याचारासारख्‍या घटनेबाबत विद्यापीठाचे धोरण नाही. त्‍यामुळे कोणतीही कारवाई निष्‍फळ ठरेल, असे मला सांगण्‍यात आले होते. यावर एकच मार्ग होता. तो म्‍हणजे पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करणे. हे पाऊल उचलण्‍यास माझी तयारी नव्‍हती. परंतु, इतर विद्यार्थिनींना अशा प्रकारच्‍या घटनांपासून वाचविण्‍यासाठी इशारा देणे आवश्‍यक होते. म्‍हणून मी ब्‍लॉगच्‍या माध्‍यमातून अत्‍याचाराची घटना सांगितली.

या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या तीन सदस्यीय समितीपुढे तिने तोंडी आणि लेखी जबाब नोंदविला. त्‍यानंतर तिने अतिरिक्त महाधिवक्ता इंदिरा जयसिंह यांना शपथपत्र पाठवून घटनेची सविस्‍तर माहिती जाहीर करण्‍यास संमती देऊन योग्‍य कारवाई करण्‍याची विनंती केली होती.


तत्‍पुर्वी, लैंगिक षोषणाच्‍या आरोपांमागे षडयंत्र असल्‍याचे न्‍या. गांगुली यांनी म्‍हटले आहे. सरन्‍यायाधीश सत्‍यशिवम यांना लिहीलेल्‍या पत्रात ते म्‍हणाले, की बड्या लोकांच्या विरोधात मी निकाल दिले आहेत. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच माझ्याविरुद्ध कुभांड रचण्यात आले आहे. मला बदनाम करण्याचेच हे षड्यंत्र आहे. तरुणीचे र्लैगिक शोषण कधीही केले नाही. न्यायालयात गेलो तेव्हा मला कैद्यासारखी वागणूक मिळाली.

काय म्‍हणाले न्‍या. गांगुली... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..