आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Law Intern Likely To File Police Complaint Against AK Ganguly

लैंगिक शोषण प्रकरण : वकील तरुणी देणार गांगुलींविरुद्ध तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/कोलकाता - लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.के. गांगुली यांच्यावर कठोर टीका करत पीडित महिला प्रशिक्षणार्थी वकिलाने पोलिसांत तक्रार नोंदवण्याचे संकेत दिले.
मुद्द्यातील गुंतागुंत वाढावी म्हणून प्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय रंग दिला जात आहे. तपास, जबाबदारी टाळण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत, असे तरुणीने म्हटले आहे. लॉच्या विद्यार्थिनींना जागरूक करण्यासाठी ब्लॉगवर आपबीती टाकली, असेही तिने म्हटले आहे. गांगुली यांनी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांना पत्र पाठवून आरोप फेटाळून लावले आहेत, हे विशेष.
काही शक्तीशाली गटांविरुद्ध आपण दिलेल्या कठोर निर्णयांमुळे आता आपली बदनामी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे गांगुली यांनी त्यात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पीडितेने ब्लॉग लिहून आपले म्हणणे मांडले आहे.
पोलिस तक्रार नोंदवण्याचे संकेत देत तिने म्हटले आहे की, याचा निर्णय मी माझ्या विवेकबुद्धीने घेईल. योग्य वेळ येताच कारवाईचे पाऊल उचलेन, माझ्या स्वायत्ततेचा सन्मान करण्यात यावा. आपल्यावर खोटारडेपणाचा आरोप करणार्‍यांनी लक्षात घ्यावे की ते माझाच नव्हे तर सर्वाेच्च न्यायालयाचाही अवमान करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आपण अत्यंत जबाबदारीने वागलो असल्याचेही पीडितेने म्हटले आहे.