आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्काराच्या प्रकरणात कायद्याचा गैरवापर, न्यायालयाची टिप्पणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर संबंध तुटल्यावर अनेक महिला कायद्याचा ‘बदला घेण्याचे शस्त्र’ म्हणून वापर करतात. घटस्फोटित महिलेवर बलात्काराच्या आरोपातून एका वकिलाची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

३८ वर्षीय महिला परिपक्व आणि संमती देण्यास सक्षम होती. तिने संमतीनेच संबंध ठेवले. दोघे एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत हाेते. भांडण झाल्यानंतर तिने बलात्काराचा आरोप केला, असे अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती संजीव जैन यांनी म्हटले आहे.दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलाश परिसरातील घटस्फोटित महिलेचा रस्ते अपघात झाला हाेता. आरोपी याच खटल्यात तिला वकील बनला होता. त्यानंतर दोघांची मैत्री घनिष्ठ बनत गेली होती.

न्यायालय म्हणाले
अशी अनेक प्रकरणे येत आहेत की ज्यात महिला आधी संमतीने शारीरिक संबंध ठेवतात. परंतु काही कारणास्तव संबंध तुटले की कायद्याचा बदला घेण्याचे’ शस्त्र म्हणून वापर करतात.
बातम्या आणखी आहेत...