आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान प्रवाशांना सुखद ‘टेक ऑफ’चा धक्का! नियमांत दुरुस्ती होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विमान प्रवास प्रत्येकाला सुखावह व्हावा म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने यासंबंधीच्या नियमांत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, रद्द करण्यात आलेल्या तिकिटांच्या भाड्याची रक्कम लवकरात लवकर परत करण्यापासून बॅगेजसाठी लागणारा खर्चही कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.

नागरी उड्डयन मंत्री गजपती राजू यांनी ही माहिती दिली. विमान उड्डयन क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून यामुळे भारतीयांना विमान प्रवास सुखावह होईल, असा दावा त्यांनी केला. विमान प्रवाशांना सद्य:स्थितीत ऐनवेळी विमान रद्द झाले किंवा विमानास विलंब झाला तर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. आता यापोटी दिली जाणारी तगडी नुकसान भरपाई प्रवाशांना मिळेल. शिवाय, क्षमतेपेक्षा अधिक तिकीट बुकिंग झाले आणि प्रवाशांना बोर्डिंग मिळाले नाही तर एक तासाच्या आत पर्यायी उड्डाणाची व्यवस्था संबंधित कंपनीला करावी लागेल. अशा प्रवाशांना दिलासा देणाऱ्या तरतुदी नव्या नियमांत असतील.
असाही दिलासा... : तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना रोख रक्कम परत मिळू शकेल किंवा आपल्या खात्यात जमा ठेवता येईल. याशिवाय तिकीट एखाद्या ट्रॅव्हल एजंटकडून किंवा ऑनलाईन काढलेले असेल तर संबंधित कंपनीला ही रक्कम देशांतर्गत उड्डाणांसाठी १५ दिवसांच्या आत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी १ महिन्यांच्या आत मिळावी याची जबाबदारी घ्यावी लागेल.
दिव्यांग लोकांसाठी विशेष मदत
विमान प्रवासात दिव्यांग (अपंग) लोकांना मदत करण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी म्हणून कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा लोकांबाबत कर्मचारी संवेदनशील व्हावेत, हा यामागचा हेतू आहे.
लगेजचे ओझे कमी करणार
लगेजच्या मर्यादेपेक्षा अधिक ओझे असेल तर सामान्यत: विमान कंपन्या १५ ते २० किलो साहित्यावर १०० रुपये प्रति किलो अतिरिक्त फी लावतात. हा अधिभार कंपन्यांनी बंद करावा, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
नागरी उड्डयन
मंत्र्यांच्या घोषणा
> चाेवीस तास आधी विमान रद्द झाले तर भरपाईच्या रकमेत १० हजारांची वाढ.
> हा कालावधी २४ तासांपेक्षा कमी असेल तर बेस फेअरच्या २०० पट भरपाई.
> हाच कालावधी चोवीस तासांपेक्षा अधिक असेल तर ४०० पट भरपाई किंवा २० हजार रुपये यात जी रक्कम कमी असेल ती मिळू शकेल.
> सर्वच प्रकारच्या भाड्याचा परतावा मिळू शकेल. यात अन्य शुल्कांचाही समावेश असेल.
बातम्या आणखी आहेत...