सीकर - येथील भादवासीमध्ये सामाजिक बदलाची एक अनोखी सुरुवात पाहायला मिळाली. सावित्री फगेडिय़ा या वकील मुलीने तिचे डॉक्टर वडील राजकुमार यंच्या निधनानंतर मुंडन केले. तसेच तिने इंजिनिअर असलेली मोठी बहीण गायत्री आणि भावाच्या बरोबरीने वडीलांच्या तिरडीला खांदाही दिला.
सावित्री या भुज (गुजरात) मध्ये वकील आहेत. तर त्यांची बहीण गायत्री पुण्यात इंजिनिअर आहे. माझ्या बहिणीच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा असे मत गायत्रीने व्यक्त केले आहे. गायत्रीच्या मते त्यांचे वडील राजकुमार हे अनेक वर्षांपूर्वी कच्छला स्थायिक झाले होते. 24 जून रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर भावाबरोबरच दोन्ही बहिणीही वडीलांच्या तिरडीला खांदा देतील आणि, त्यांना मुखाग्नी देतील असे ठरवण्यात आले.
मुला - मुलीत फरक नको
सावित्री यांनी सांगितले की, त्यांना एक भाऊ असला तरीही त्यांनी मुंडन करण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे मुलगा आणि मुलगी हे सारखेच असतात हा संदेश त्यांना समाजापर्यंत पोहोचवायचा होता.
मुंडन करणारी सावित्री, यावेळी तिने इतरही सर्व विधी केल्या.
पुढील स्लाईड्सवर पाहा अत्यंतविधींचे फोटो...