आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Leader, Member Of Union Or State Legislative, Judge Doesn't Recived Abroad Hospitality

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेते, लोकप्रतिनिधी, न्यायमूर्तींनी विदेशी ‘आदरातिथ्य’ स्वीकारता येणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, आमदार, खासदार आणि न्यायमूर्तींनी परदेशी ‘आदरातिथ्य’ स्वीकारण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे आदरातिथ्य स्वीकारायचे झाल्यास त्यांना संबंधित अधिका-यांकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.


संसद किंवा विधिमंडळांचे सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, न्यायमूर्ती किंवा सरकारी अधिका-यांना भारताबाहेर दौ-यावर गेल्यानंतर केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही स्वरूपातील परदेशी ‘आदरातिथ्या’चा स्वीकार करता येणार नाही, असे केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सरकारच्या नियंत्रणात असलेल्या महामंडळांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सरकारी अधिका-यांना अशा आदरातिथ्याचा स्वीकार करण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करून परवानगी घ्यावी लागेल. खासदार, आमदार, न्यायमूर्ती आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्यक्तिश: किंवा ऑनलाइन अर्ज करून अशी परवानगी घेऊ शकतील, असे या पत्रात म्हटले आहे.