आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३१ % पेक्षा जास्त पेंट्समध्ये शिशाचे प्रमाण धोकादायक, गर्भवती-मुलांसाठी हानिकारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मॅगी नूडल्सच नव्हे तर घरांत लावले जाणारे पेंट्सही धोकादायक आहेत. एका नव्या अभ्यासानुसार, घरांत लावल्या जाणाऱ्या ३१ टक्क्यांपेक्षा जास्त रंगामधील शिसाचे (लीड) प्रमाण धोकादायक स्तरावर आहे. ते मुले आणि गर्भवती महिलांसाठी गंभीर प्रमाणात हानिकारक आहे.
टॉक्सिक लिंकने ‘लीड इन इनॅमल हाउसहोल्ड पेंट्स इन इंडिया २०१५’ या शीर्षकानुसार हा अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यात १०१ इनॅमल पेंट्सचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी ३२ पेंट्समध्ये शिसाचे प्रमाण १०,०००० पीपीएम (पार्ट‌्स पर मिलियन) आहे. भारतीय मानक ब्युरोच्या मानकांनुसार पेंट्समध्ये शिसे ९० पीपीएमपेक्षा जास्त असू नये. हे सर्व ३२ पेंट्स लहान व मध्यम कंपन्या तयार करतात. यापूर्वी २०१३ मध्येही असाच अभ्यास झाला होता. त्यातही शिशाचे प्रमाण हानिकारक असल्याचे म्हटले होते. टॉक्सिक लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितले की, आपण भारतीय मानक ब्युरोच्या मानकांचे पालन करत आहोत, असा दावा कंपन्यांनी केला होता. पण हे दावे फोल ठरले आहेत.

पेंट्स किती धोकादायक ?
{९० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) शिसे हानिकारक नाही. (भारतीय मानक ब्युरोनुसार) { १०,००० पीपीएम शिसे आढळले ३२ पेंट्समध्ये (२०१३ मध्ये ३१ पेंट्स म्हणजे ४४ टक्क्यांत शिसे हानिकारक स्तरावर आढळले होते.)
{३ पेंट्सच २०१३ ते २०१५ दरम्यान शिशाचे प्रमाण घटवून ९० पीपीएमपर्यंत आणू शकले.
बातम्या आणखी आहेत...