आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST : एलईडी बल्बच्या किमतीत वाढ; टुयूबलाईट स्वस्त तर पंखे महागले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर आता एलईडी बल्बच्या किमतीत किचिंत वाढ झाली आहे. उजाला योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या एनर्जी इफिशंन्सी सर्विसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. पूर्वी 65 रुपये असणारी एलईडी बल्बची किंमत आता 70 रुपये झाली आहे. जीएसटी अंतर्गत यावर 12 टक्के कर आकारण्यात येत आहे. 
 
एलईडी बल्बच्या नव्या किमती
- उर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता 9 वॅटच्या बल्बची किंमत 70 रुपये तर 20 वॅट एलईडी टुयूबलाईटची किंमत 220 रुपये असणार आहे. 50 वॅटच्या पंख्याची किंमत 1, 200 रुपये असणार आहे. 
- टुयूबलाईट स्वस्त झाली आहे तर पंखा महाग झाला आहे. पूर्वी 20 वॅट टुयूबलाईटची किंमत 230 रुपये होती तर पंख्याची किंमत 1.150 रुपये होती. पंख्याला 28 टक्क्याच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्याने त्याची किंमत वाढली आहे. 
- उर्जा मंत्रालयाने कोणी जर जास्त किंमत आकारत असेल तर ईईएसएलच्या ट्विटर अथवा फेसबुक अकाउंटवर संपर्क साधण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त 18001803580 या क्रमांकावरही संपर्क साधता येऊ शकतो. 
- उजाला योजना जानेवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आली. याचा उद्देश 77 कोटी जुन्या बल्ब ऐवजी एलईडी बल्ब वापरण्यास लोकांना प्रवृत्त करण्याचा आहे. या अंतर्गत आतापर्यंत देशभरात 24.8 कोटी कोटी बल्ब, 27.6 लाख टुयूबलाईट आणि 10 लाख पंखे बदलण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...