आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64% लोक अनुदानित एलईडीबाबत अनभिज्ञ; प्रचार-प्रसाराअभावी योजनेच्या उद्देशाला तडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकार आक्रमक पद्धतीने एलईडी बल्बच्या वापराला प्रोत्साहन देत असतानाच देशातील ६४ टक्के नागरिकांना कमी वीज लागणारे हे बल्ब मिळालेले नाहीत आणि हे सबसिडीवरील बल्ब कुठे मिळतात, हे त्यांना माहितीही नसल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

लोकल सर्किलने ५६ हून अधिक शहरे आणि २० हून अधिक राज्यांत केलेल्या सर्वेक्षणात एलईडी बल्ब कसे मिळवायचे हे माहीतच नसल्याचे ६४ टक्के लोकांनी सांगितले आहे. सरकारने एलईडी बल्ब वितरणाची घोषणा केली. त्यानुसार ग्राहक वीज मंडळांकडून स्वस्त दरात हे बल्ब खरेदी करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने ही घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी वितरण मात्र राज्य वीज मंडळांच्या हातात आहे.

खुल्या बाजारात विक्री : केंद्र सरकार स्वस्त दरात एलईडी बल्ब देत असले तरी सबसिडीवरील या बल्बची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. हे बल्ब आणि खुल्या बाजारातील बल्ब यांच्यातील फरक ओळखणे अवघड असल्याने काळाबाजार करणारे हात धुऊन घेत असल्याचेही या सर्वेक्षणात समोर आले आहे.

सर्वाधिक अनभिज्ञ असे
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार २० राज्यांतील सर्वाधिक अनभिज्ञ लोक खालील राज्यांत आहेत. ते असे...

अपेक्षा काय?
एलईडी बल्ब खरेदी करण्याची प्रक्रिया अिधक सुलभ असायला हवी. त्याबाबत स्थानिक क्षेत्रीय भाषांत प्रचार- प्रसार व्हायला हवा. शिवाय ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या वीज बिलावरही त्यासंबंधी माहिती असावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.

कारणे काय?
सबसिडीवर मिळणारे एलईडी बल्ब कुठून खरेदी करायचे आहेत? ते किती बल्ब खरेदी करू शकतात? आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते? याबाबतची कोणतीही उपयुक्त माहिती सरकारच्या वतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यातच आलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...