आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूवर डाव्यांचेच वर्चस्व, पांडे अध्यक्ष; वाद उकरूनही ABVPचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बहुचर्चित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांनी चारही जागा जिंकल्या. डाव्या आघाडीचे मोहितकुमार पांडे अध्यक्षपदी विजयी झाले. अमल पीपी उपाध्यक्ष, तबरेज हसन सहसचिव सतरूपा चक्रवर्ती हे महासचिवपदी निवडून आले.

काऊंसिलरच्या ३१ पैकी ३० जागांवरही डाव्यांनीच विजय मिळवला. अभाविपला केवळ एकच जागा मिळाली. काही महिन्यांपूर्वी देशविरोधी घोषणाबाजी आणि विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारवर भरलेला देशद्रोहाचा खटला यामुळे यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मागच्या वेळी सहसचिवाची एक जागा जिंकणाऱ्या अभाविपला यंदा एकही जागा मिळाली नाही. जेएनयूचा निकाल संपूर्ण देशासाठी संदेश आहे. आमच्या चुरशीत अभाविप कुठेच नव्हती,’ असे नवे अध्यक्ष मोहितकुमार पांडे यांनी निकालानंतर सांगितले.
बातम्या आणखी आहेत...