आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Legal Notice To Congress After Its Official Twitter Handle Calls Savarkar ‘Traitor’

सावरकरांना गद्दार म्हटल्याने काँग्रेसला लिगल नोटीस, देशातील पहिलीच घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना गद्दार म्हणणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि सावरकरांचे पणतू रंजीत यांनी लीगल नोटीस पाठवली आहे. एखाद्या राजकीय पक्षाला ट्विट केल्यामुळे कायदेशीर नोटीस मिळण्याची ही देशातील कदाचित पहिली घटना मानली जात आहे.

काय आहे प्रकरण
>> सावरकरांचे पणतू रंजीत यांनी त्यांच्या वकिलाच्या वतीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवली आहे. 16 जून रोजी ही नोटीस पाठवली.
>> एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तात रंजीत यांचे वकील हितेश जैन म्हणाले, 'आम्ही काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून 48 तासांमध्ये विना अट माफी मागण्यास सांगितले आहे.'
>> नोटीसमध्ये म्हटले आहे, की काँग्रेसने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर, @INC वरुन 5,22 आणि 23 मार्च रोजी काही ट्विट केले होते. त्यातील एक ट्विटमध्ये सावरकरांना गद्दार म्हणण्यात आले होते. या ट्विट सोबत सावरकरांचा फोटोही होता.
>> नोटीसमध्ये म्हटले आहे, की काँग्रेसने आझादांना स्वातंत्र्याची मागणी करणारे खरे देशभक्त तर सावरकरांना दययेची भीक मागणारे ब्रिटीशांचे गुलाम म्हटले होते.
>> नोटीसमध्ये म्हटले आहे, की काँग्रेस नेत्यांनी एका स्वाभिमानी आणि राष्ट्रवादी नेत्याचा अवमान केला आहे.

काँग्रेसचे तोंडावर बोट
>> काँग्रेसने नोटीस मिळाली का, या प्रश्नावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
>> देशामध्ये राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरुन होणारा गोंधळ आणि त्यावरुन कायदेशीर नोटीस बजवाण्याचे प्रकार काही नवे नाहीत, मात्र सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरील वक्तव्यामुळे राजकीय पक्षाला नोटीस बजावण्याची ही देशातील कदाचीत पहिली घटना आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय होते ट्विटमध्ये..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...