आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या पाठीवरील दप्तराचे अाेझे होणार कमी, राज्य सरकार सकारात्मक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक अाहे. त्यासाठी बैठक घेण्यात अाली असून लवकरच यावर ताेडगा काढला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सामान्य प्रशासन, संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

विज्ञानभवनात मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळाच्या ६३ व्या बैठकीत पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या अाेझ्याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी हाेत्या. पाटील म्हणाले, शालेय स्तरावर मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंबंधी राज्य सरकार सकारात्मक आहे. तज्ज्ञांच्या समितीने याबाबत शासनाकडे आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मुलाच्या एकूण वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन असावे आणि आठव्या वर्गापर्यंत दप्तराचे वजन जास्त वाढू नये यावर विचार सुरू
आहे. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन २ किलो तर आठवी पर्यंत दप्तर ४ किलो पेक्षा जास्त नसावे. असा नियम ठरवण्याबाबत निर्णय हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुन्हा परीक्षा पद्धती
स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणात असे सिद्ध झाले आहे की, मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर गेल्या ५ वर्षांपासून सतत खालावत आहे. अभ्यास केला नाही तरी उत्तीर्ण होतो ही भावना विद्यार्थ्यांमधे वाढीस लागली आहे. म्हणूनच जुन्याच परीक्षा पध्दतीचा विचार व्हावा, अशी आग्रही भूमिका पाटील यांनी मांडली. राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) हे विषय राज्यात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावरच शिक्षणात अनिवार्य करण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.