आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LET Founder Hafiz Saeed To Hold Rally For Masarat Alam News In Marathi

मसरतसाठी पाकमध्ये रॅली, दहशतवादी हाफिज म्हणाला-ही स्वातंत्र्याची लढाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये देशाविरोधात आयोजित रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकावणारा फुटीरवादी नेता मसरत आलमच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर काश्मीर खोर्‍यात तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, दहशतवादी संघटना लश्कर-ए- तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने मसरतला समर्थन दिले असून ही स्वातंत्र्याची लढाई असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मसरतच्या अटकेविरोधात पाकिस्ताना रॅली काढणार असल्याचे हाफिज सईदने जाहीर केले आहे. हाफिज सईद हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.
मसरतला शुक्रवारी अटक केल्यानंतर फुटीरवाद्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवताच निदर्शकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. या घटनेत 14 जण जखमी झाले आहे. दरम्यान, त्राल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
हाफिज सईद म्हणाला, 'मसरत आलमवर देशद्रोहाचा आरोप आहे. परंतु हा देशद्रोह नसून स्वातंत्र्याची लढाई आहे. मसरतने नवी दिल्ली नव्हे, श्रीनगरमध्ये पाकिस्तानी‍ झंडा फडकावला आहे. श्रीनगर ही जम्मू-काश्मीरची राजधानी आहे. श्रीनगरला यूएन रिझॉल्युशनमध्ये वादग्रस्त क्षेत्र म्हटले आहे.'
जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी केलेले आंदोलन योग्यच आहे. श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. याचा अर्थ असा की, काश्मीरातील जनतेला आता भारतासोबत राहायचे नाही, असेही हाफिज सईदने म्हटले आहे.