आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरल दलवीरसिंग सुहाग यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्विकारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल दलवीरसिंग सुहाग (59) यांनी पदभार स्वीकारला. मावळते लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी साऊथ ब्लॉकस्थित कार्यालयात सुहाग यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली. तोफखाने, थलसेना व वायुसेनेच्या आधुनिकीकरणावरून लष्करी दलासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. त्यांचा सक्षमपणे मुकाबला करण्यासह कोणत्याही युद्धाला सामोरे जाण्यासाठी सज्जता सुरू असताना सुहाग पदावर आले आहेत. गोरखा रेजिमेंटचे अधिकारी असलेले सुहाग देशाचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून ते 30 महिने पदावर राहतील.