आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI कडून पुन्हा 500 ची नवीन नोट जाहीर; चलनात असलेल्या नोटा बाद होणार नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या आणि सध्या चलनात असलेल्या 500 च्या नोटांचा रंग एकच आहे. (फाईल) - Divya Marathi
नव्या आणि सध्या चलनात असलेल्या 500 च्या नोटांचा रंग एकच आहे. (फाईल)
नवी दिल्ली - नुकतेच 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन चलनी नोटा जाहीर करणाऱ्या आरबीआयने आता 500 रुपयांची आणखी एक नवीन नोट जाहीर केली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या 500 रुपयांच्या नोटा 'E' सिरीजच्या होत्या. नव्या 500 च्या नोटा 'A' सिरीजसह चलनात येतील. यासोबतच नवीन नोटांवर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. तसेच त्यावर 2017 असे नमूद करण्यात आले आहे. 
 
- नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन चलनी नोटा जाहीर करण्यात आल्या होत्या. 
- नोटबंदीचा मुख्य हेतू काळ्या पैश्यावर अंकुश ठेवणे आणि बनावट नोटांचे प्रकार थांबवणे असा होता. 
- 500 च्या आणखी नव्या नोटा जाहीर करण्यामागे बनावट नोटांची प्रकरण थांबवणे हा असल्याचे सांगितले जात आहे. 
 
असा राहील नवा नोट...
नव्या नोटांवर महात्मा गांधी यांची इमेज आहे. नोटाच्या मध्यभागी सुद्धा महात्मा गांधी यांचे चित्र आहे. अशोक स्तंभ आणि ओळख चित्र आहे. देवनागरी भाषेत नोटेवर 500 रुपये असे लिहण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...