आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीला दीक्षित यांच्याविरोधात एसीबी तपासाला उपराज्यपालांची परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी ४०० कोटी रुपयांच्या वॉटर टँकर घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी शाखेला (एसीबी) तपास करण्याची परवानगी दिली आहे.

केजरीवाल सरकारने १३ जून रोजी दीक्षित यांच्याविरोधात सीबीआय किंवा एसीबीच्या तपासाची शिफारस केली होती. दिल्ली विधानसभेतील िवरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी या घोटाळ्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी दीक्षित यांच्याविरोधात चौकशीची शिफारस केली होती. जल बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष शीला दीक्षित जल बोर्डाचे इतर सदस्य घोटाळ्यात संलग्न होते, असे अहवालात म्हटले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)