(फाइल फोटो: दिल्ली मुख्यमंत्र्यांची रिकामी खुर्ची. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही खुर्ची रिकामीच आहे.)
नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत नव्याने विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. भाजपने आज (सोमवार) दिल्लीत सत्ता स्थापन करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दिल्लीत नव्याने विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचे निमंत्रण नाकारले आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश मुखी यांनी आज नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उपाध्याय यांनी जंग यांना भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्याचे सतीश उपाध्याय यांनी सांगितले. दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याची मागणीही भाजपने यावेळी केली.
भाजपच्या संसदीय समितीची रविवारी रात्री बैठक झाली. दिल्लीत सत्ता स्थापन न करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत नव्याने विधानसभा निवडणूक घ्या, अशी मागणी कॉंग्रेस आणि '
आप'ने केली होती. आता भाजपनेही दिल्लीत नव्याने निवडणूक घ्या, अशी मागणी केल्याने दिल्लीत निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद
केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली होती. मात्र, केजरीवाल यांनी काही महिन्यांतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नंतर दिल्ली विभानसभा बरखास्त केल्याची घोषणाही 'आप'ने केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, राज्यपाल जंग यांचे निमंत्रण केजरीवालांनी नाकारले...