आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा दणकाः सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्‍या दरात वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने सर्वसामान्‍य जनतेला महागाईचा आणखी एक दणका दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्‍या किंमतीत वाढ करण्‍यात आली आहे. सरकारने विनाअनुदानित सिलिंडरच्‍या किंमतीत 4.21 रुपये तर अनुदानित सिलिंडर 3.46 रुपयांची वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने आधार क्रमांक संलग्नित केलेल्‍या ग्राहकांच्‍या सिलिंडरच्‍या किंमतीत 65 रुपयांची वाढ केली होती.

काही दिवसांमध्‍ये कच्‍च्या तेलाच्‍या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच डॉलरच्‍या तुलनेत रुपया अजूनही दुबळाच आहे. त्‍यातच इराण आणि पश्‍चिमेकडील देशांत अणुकारारावरून सुरु झालेला वाद निवळलेला नाही. त्‍यामुळे गॅस सिलेंडरचे दर वाढविण्‍यात आले आहेत. तसेच पेट्रोलच्या दरात एक रुपयाने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. इंधनामुळे होत असलेल्या दरवाढीमुळे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. सरकारने डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्‍याच्‍या दिशेने पावले उचलली आहेत. काही महिन्‍यांमध्‍येच याबाबत निर्णय होणार आहे. त्‍यामुळे महागाई आणखी भडकणार आहे.