आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Draws The Line On Criminal Records

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारी लपवणे हा उमेदवाराचा भ्रष्टाचारच - सुप्रीम कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एखाद्या उमेदवाराने त्याच्यावरील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती दडवली तर त्याचा हा गुन्हा भ्रष्टाचाराच्या श्रेणीत येतो. त्यामुळे त्याची निवडही रद्द केली जाऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती दीपक मिश्र यांच्या पीठाने म्हटले की, उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्हेगारी पार्श्वभूमी विशेषत: निघृ़ण सदरात मोडणारे गुन्हे, भ्रष्टाचार किंवा नैतिक मूल्यांशी संबंधित गुन्ह्यांचा तपशील जाहीर करणे आवश्यक आहे. असा तपशील कुणी दडवत असेल तर त्याची निवड रद्द केली जाऊ शकते. तामिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका निवडणुकीसंदर्भात सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला.