आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा प्रकरणात पॉलिग्राफ टेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी एसआयटीने ६ जणांची पॉलिग्राफ चाचणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले. गरज वाटल्यास पोलिस आणखी काही जणांची पॉलिग्राफ टेस्ट करतील. अद्याप करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल हाती आला नाही. १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता. शशी आणि सुनंदा यांच्यात पत्रकार मेहर तरारशी जवळीक हा वादाचा मुद्दा होता.
बातम्या आणखी आहेत...