आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lieutenant Governor Najeeb Jung Address Delhi Assembly

\'खासगी वीज कंपन्यांनी ऑडिट करण्यास सहकार्य केले नाही तर परवाने रद्द\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ली - दिल्ली सरकारची प्राथमिकता लोकपाल विधेयक मंजूर करण्याची असल्याचे दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या तीनही खासगी वीज कंपन्यांचे कॅग कडून ऑ़डिट केले जाईल, जी कंपनी कॅगला सहकार्य करणार नाही त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असे जंग यांनी कंपन्यांना खडसावले आहे. दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी आज अभिभाषण केले. यावेळी त्यांनी दिल्लीच्या जनतेने परिवर्तनाला मतदान केले असल्याचे सांगितले आहे.
जंग म्हणाले, दिल्लीचे मंत्री त्यांच्या कारवर लालदिवा लावणार नाहीत. सरकारच्या प्रत्येक विभागातील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. सरकारच्या प्रत्येक योजनेत जनतेचा सहभाग राहिल याकडे दिल्ली सरकार लक्ष देणार आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. त्यासोबतच सत्तेवर आल्यानंतर दिल्ली सरकारने सर्वप्रथम दिल्लीतील खासगी वीज वितरण कंपन्यांचे कॅग मार्फत ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. तो योग्य असल्याचे जंग म्हणाले. जी कंपनी कॅगल ऑडिटमध्ये सहकार्य करणार नाही, त्यांचा परवाना रद्द केला जाईल. तसेच वीट मीटरचीही चौकशी केली जाईल असे जंग म्हणाले.

आगामी काळात दिल्ली सरकार काय काय करणार याचा पाढाच नजीब जंग यांनी अभिभाषणात वाचला. ते म्हणाले, दिल्लीतील खासगी शाळांमध्ये सुरु असलेली डोनेशन पद्धती बंद केली जाईल. खासगी शाळांमध्ये शुल्क निश्चितीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. दिल्लीतील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले जाणार आहे. आरोग्याच्या सुविधा वाढविण्यासाठी दिल्लीत जास्तीत जास्त सरकारी दवाखाने सुरु करण्यात येणार आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष्य दिले जाईल. न्यायालयात खटले रेंगाळत राहु नये यासाठी नवीन न्यायालये स्थापन करुन तिथे न्यायधिशांची नियुक्ती केली जाईल. महिलासंबंधीची प्रकरणे जास्तित जास्त सहा महिन्यांमध्ये निकाली काढली जातील, याकडे राज्य सरकार लक्ष्य देईल.
नजीब जंग म्हणाले, दिल्ली सरकरा पुढील एक वर्षात अनधिकृत कॉलनींना अधिकृत करेल आणि झोपडपट्टीमध्ये राहाणा-या नागरिकांना पक्की घरे दिली जातील.