आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : संघ स्वयंसेवक ते पंतप्रधान या प्रवासातील मोदींचे जीवन, पाहा Rare Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर गुजरातच्या वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 ला जन्मलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. मोदींनी राज्यशास्त्राच एम ए केले आहे. लहानपणापासूनच त्यांचा संघाकडे ओढा होता. गुजरातमध्ये आसएसएसनेही चांगलेच पाय रोवलेले होते. ते 1967 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी अहमदाबादला पोहोचले. त्याचवर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेतले. त्यानंतर 1974 मध्ये ते नव निर्माण आंदोलनात सहभागी झाले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.
 
2001 मध्ये केशुभाई पटेल यांच्या मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर मोदींकडे गुजरातचा कारभार देण्यात आला. त्यानंतर सलग 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर आता केंद्रात त्यांच्या नेतृत्त्वात सत्ता आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे काही दुर्मिळ फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींचे बालपणीपासूनचे Rare Pics.. 
बातम्या आणखी आहेत...