आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life On Mars Buddha Statue Proves Aliens Did Exist On Red Planet

मंगळावर भगवान बुद्धांची प्रतिमा दिसल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी ‘नासा’सह अन्य देशांच्या मोहिमा सुरू असताना अशात या ग्रहावर भगवान गौतम बुद्धांची मोठी प्रतिमा दिसल्याचा दावा ‘यूएफआ साईटिंग डेली कंपनी’ने केला आहे.

ही कंपनी परग्रहांवरील जिवांचे अस्तित्व (एलियन्स) शोधत असून त्यावर कंपनी संशोधन करत आहे. कंपनीचे अधिकारी स्कॉट सी. वेअरिंग यांच्यानुसार, मंगळावरील छायाचित्रात एक कोरलेली प्रतिमा दिसून येते. छाती, पोट व खांद्याचे आकार या प्रतिमेमध्ये अत्यंत स्पष्ट दिसतात. मात्र नासा ही माहिती मुद्दाम दडवून
ठेवत असल्याचा दावा वेअरिंग यांनी केला आहे.