आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावी महिला व्यावसायिकांत अरुंधती, आयसीआयसीआयच्या चंदा कोचर दुस-या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य देशातील सर्वांत शक्तिशाली महिला व्यावसायिक ठरल्या आहेत. फाॅर्च्यून इंडियाने देशातील शक्तिशाली ५० व्यावसायिक महिलांची यादी तयार केली आहे. यात वरच्या तीन जागांवर बँक क्षेत्राचेच वर्चस्व आहे. देशातील सर्वांत मोठी खासगी बँक आयसीआयसीआयच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर दुस-या आणि अॅक्सिस बँकेच्या एमडी तथा सीईओ शिखा शर्मा तिस-या स्थानावर आहेत.
फाॅर्च्यून इंडियाने म्हटले आहे की, भट्टाचार्य यांनी बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. वर्षभरापूर्वी प्रमुखपद स्वीकारले तेव्हापासून बँकेचे सांपत्तिक स्थिती सुधारणे, खर्चकपात आणि खेळते भांडवल वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.

टाॅप १० मधील इतर
४. निशी वासुदेवा, सीएमडी, एचसीएल
५. जिया मोदी, सहसंस्थापक, एजेडबी पार्टनर्स
६. मल्लिका श्रीनिवासन, सीईओ टीएएफई
७. अरुणा जयंती, सीईओ, कॅपजेमिनी, इंडिया
८. पृथा रेड्डी, एमडी, अपोलो हाॅस्पिटल
९. किरण मुजुमदार, सीएमडी, बायोकाॅन
१०. शोभना भारतीया, प्रमुख, एचटी, मीडिया
यादीत पहिल्यांदाच
- अरुंधती भट्टाचार्य, चेअरपर्सन, एसबीआय
- शाहनाज हुसेन, संस्थापक, शाहनाज ग्रुप आॅफ कंपनीज
- झरीन दारूवाला, प्रेसिडेंट, होलसेल बँकिंग, आयसीआयसीआय बँक
- अर्चना हिंगोरनी, वृत्तसंस्था सीईओ, आयएलअँड एफएस
इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स
- वाणी कोला, एमडी, कलारी कॅपिटल
- व्हेलेरी वॅगनर, एमडी, झीपडायल
जगातील टाॅप ५
गिनी रोमेटी, प्रमुख व सीईओ, आयबीएम
मेरी बारा, सीईओ, जनरल मोटर्स
इंद्रा नुयी, चेअरपर्सन व सीईओ, पेप्सिको
मेरिलिन ह्यूसन, चेअरपर्सन व सीईओ लाॅकहीड मार्टिन
अॅलन कुलमन, चेअरपर्सन व सीईओ ड्यूपोंट
फाॅर्च्यून टाॅप ५० मध्ये इंद्रा नुयीखेरीज कोणीही भारतीय नाही.