आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature World: Ban On Book Its Mean Real Death Of Autor Taslima Nasrin

साहित्य विश्‍व:पुस्तकावर बंदी हा लेखकाचा ‘खरा मृत्यू’च! - ल‍ेखिका तस्लिमा नसरीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोलकात्याला सिटी ऑफ जॉय म्हटले जात असले तरी तेथे परतण्याची आशा वाटत नाही. खरे तर आपल्या पुस्तकावरील बंदी म्हणजे लेखकाचा ‘खरा मृत्यू’ असतो, असे वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे.
सध्या कोलकाता ग्रंथोत्सव सुरू आहे. त्यात तस्लिमा यांच्या ‘निषिद्धो’ पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी लेखिकेने ही हताश प्रतिक्रिया दिली आहे. आता पश्चिम बंगालमधील परिस्थिती अगदी बांगलादेशसारखीच झाली आहे. तेथे मला प्रवेश दिला जात नाही. माझ्या पुस्तकांवर बंदी घातली जाते. मी लिहिलेल्या टीव्ही कार्यक्रमांनाही मनाई करण्यात आली आहे. हीच गोष्ट कोलकाता ग्रंथोत्सवात झाली आहे. मला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. माकप सत्तेवर असताना असे घडत असे. परंतु ममता बॅनर्जी यांचे सरकार आल्यानंतर त्यात बदल होईल, असे वाटत होते. परंतु त्यात काही बदल झाला नाही. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
सध्या तरी तस्लिमा यांच्या ‘निषिद्धो’ पुस्तकाला कोलकाता महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले आहे. परंतु महोत्सव 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत त्याला ठेवण्यात येईल, असा विश्वास वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2012 मध्ये हेच घडून आले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास बंगालला दुसरे बांगलादेश किंवा पाकिस्तान म्हटले जाईल.
देहदानाचा संकल्प
तस्लिमा नसरीन यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे. मृत्यूनंतर एआयआयएमएसऐवजी कोलकाता मेडिकल कॉलेजला देहदान करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
‘आम औरत पार्टी’ हवी
महिलांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी देशात आम औरत पार्टीची स्थापना व्हायला हवी. आम आदमी पार्टीने काही परिवर्तन घडवले तर चांगलेच आहे, परंतु महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांचा हक्काचा पक्ष असला पाहिजे, असे मत तस्लिमा यांनी व्यक्त केले.