आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांच्याशी निगडित गोष्टी ज्या खूप कमी लोक जाणतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस असून ट्विटर, फेसबुकवरुन त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मोदींनी वेळोवेळी 'श्रम मेव जयते'वर आपला विश्वास असल्याचे म्हटले आहे. आपल्याला जीवनात पुढे जायचे असल्यास श्रम आणि मेहनत हाच मुलमंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
स्वातंत्र्यानंतर जन्म झालेले पहिले पंतप्रधान
- नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. मोदी असे पहिले पंतप्रधान आहेत. ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला.
 
राज्यशास्त्रात एम. ए. 
- महाविद्यालयीन जीवनात मोदी NCC मध्येही सामील झाले होते. मोदींनी राज्यशास्त्रात एम. ए. केले आहे.
 
वेशभुषेबाबत सजग
पंतप्रधान मोदी हे आपल्या वेशभुषेबाबत अतिशय सजग असतात. ट्रिम्‍ड दाढी राखणाऱ्या मोदींना निळा रंग आवडतो. मोदींनी अमेरिकेत राहून 3 महिन्यांचा पब्लिक रिलेशन अॅन्ड इमेज मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केलेला आहे. 

आईला कधीच नाही विसरत
मोदी हे आपल्या आईला कधीच नाही विसरत. ते कुठेही असले तरी आईला भेटून तिचा आर्शिवाद घेतात. 

सिगारेट-दारूपासून दुर
मोदी हे सिगारेट आणि दारु पित नाहीत. ते शुध्द शाकाहारी आहेत.

लेखक आणि कवी
पंतप्रधान मोदी हे लेखक आणि कवी देखील आहेत. त्यांनी गुजराती भाषेत लिखाण केले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा नरेंद्र मोदींशी निगडित अशा बाबी ज्या कदाचित तुम्हाला नसतील माहीत
 
 
बातम्या आणखी आहेत...