आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालकिल्ल्यावरुन PMनी स्वतःचाच रेकॉर्ड मोडला, \'गरीबीपासून मुक्ती हे सर्वात मोठे स्वातंत्र्य\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 70 व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकिल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. देशातील आणि विदेशातील देशवासियांनी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दीड तासांच्या भाषणात मोदींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच देशाला गरीबी आणि दहशतवाद, माओवादापासून मुक्त करण्याचा संकल्प केला. देशासाटी बलिदान देण्याची संधी मिळाली नसली तरी आपण देशासाठी जगले पाहिजे, असे आवाहन केले.

> मोदींनी स्वतःचाच रेकॉर्ड मोडला
- मोदींनी यंदा 94 मिनिटांपर्यंत भाषण दिले. स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरुन एवढावेळ भाषण देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती.
- मागीलवेळी त्यांचे भाषण 86 मिनट 10 सेकंद चालले होते. तेव्हा त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 72 मिनिटांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला होता.
देशाला संबोधित करताना ते म्हणाले, सरकारच्या दोन वर्षांच्या योगदानाबद्दल जर मी येथे बोलायला सुरुवात केली तर दोन आठवडे मी बोलत राहिल. महागाईवर पंतप्रधान म्हणाले, दुष्काळानंतरही डाळी आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली नाही. गरीबाच्या थाळीतील अन्न महाग होऊ देणार नाही, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सव्वाशे कोटी देशवासियांनी स्वराज्याला सुराज्यात बदलण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरुन केले.

आणखी काय म्हणाले PM
> आम्ही भारत-बांगलादेशासोबतचा सीमा वाद समाप्त केला आहे.
> रियल इस्टेट विधेयक आणून मध्यम वर्गाच्या स्वप्नांना पूर्ण करण्यात मदत केली आहे.
> हिंसा आणि अत्याचाराला भारतात कोणतेही स्थान नाही. देशाला महासत्ता करायचे असेल तर हिंसेचे गरज नाही. हा देश दहशतवाद, माओवाद आणि हिंसे पुढे कधीही झुकणार नाही.
माओवाद आणि दहशतवादाच्या वळचणीला गेलेल्या युवकांना आवाहन आहे की त्यांनी परत यावे आणि देशाच्या विकासात सामील व्हावे.


> गरीबीपासून आझादी


- एकमेकांशी भांडत आम्ही संपलो आहोत, आता गरीबीशी लढायचे आहे. गरीबी पासून आम्हाला मुक्ती हवी आहे. संपूर्ण देशवासियांनी मिळून गरीबीशी लढले पाहिजे.
- आपला शेजारीही (पाकिस्तान) गरीबीतून बाहेर आला तर हिंसेपासूनही मुक्त होऊ शकतो. पेशावरच्या शाळेवर हल्ला झाला तेव्हा भारतातील शाळेतील मुलांच्याही डोळ्यात अश्रू होते.
पुढील स्लाइडमध्ये,
> पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे
> पाहा भाषणाचा व्हिडिओ
> पंतप्रधानांच्या भाषणात कॉन्फिडन्स
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...