नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गुरुवारी भाजप नेते जे.पी.नड्डा यांनी उमेदवार यादी जाहीर केली. महाराष्ट्रात सत्तेत असलेला भाजपचा मित्रपक्ष शिवसेना गोव्यात स्थानिक पक्षांसोबत आघाडी करुन लढण्याच्या तयारीत आहे. ़
- गोव्यात भाजपने 29 उमेदवारांची घोषणा केली. त्यात 18 विद्यमान आमदारांना तिकिट देण्यात आले आहे. गोव्यात एकूण 40 जागा असून सध्या तिथे भाजपची सत्ता आहे.
- पंजाबात भाजप 23 जागांवर लढणार आहे. येथे त्यांची आघाडी शिरोमणी अकाली दलासोबत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत.
- भाजपने 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातील 6 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. उर्वरित 6 उमेदवारांची घोषणा नंतर होणार आहे.
- भाजपच्या दोन उमेदवारांनी 75 पार केली आहे. त्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी देण्याच्या मनःस्थितीत नाही.
भाजपची पंजाब विधानसभा निवडणूक उमेदवार यादी
1. जालंधर नार्थ - के.डी. भंडारी
2. अबोहर - अरुण नारंग
3. भोहा - सीमा देवी
4. मुकेरियां - अरुणेश शाकर
5. सुजानपुर - दिनेश बब्बू
6. अमृतसर वेस्ट - राकेश गिल
7. अमृतसर ईस्ट - राजेश हनी
8. अमृतसर सेंट्रल - तरुण चुघ
9. दीनानगर - बिशन दास
10. दसूहा - सुखजीत कौर साही
11. होशियारपुर - तीक्षण सूद
12. लुधियाना सेंट्रल - गुरदेव शर्मा देबी
13. लुधियाना वेस्ट - प्रवीण बंसल
14. लुधियाना नॉर्थ - कमल जेटली
15. फिरोजपुर - सुखपाल सिंह नन्नू
16. राजपुरा - हरजीत सिंह ग्रेवाल
17. पठानकोट - अश्वनी शर्मा
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)