आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने आवळला लिव-इन पार्टनरचा गळा, 18 वर्षीय बॉयफ्रेंडने केली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नात्यांना काळिमा फासणारी घटना देशाच्या राजधानीत उघडकीस आली आहे. लिव-इन पार्टनरला ड्रिंक करायला लावून तरुणीने अल्पवयीन बॉयफ्रेंड आणि शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने त्याचा गळा आवळला. त्यानंतर मध्यरात्री एका निर्जनस्थळी मृतदेह फेकला. त्याची ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा विद्रुप केला. पण अखेर बिंग फुटले. विशेष म्हणजे या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे संबंधित महिला आणि तिच्या शेजारी महिलेशीही शारीरिक संबंध आहेत.
लिव-इनमधील 29 वर्षीय तरुणाचे नाव योगेंदरसिंग असे आहे. गेल्या काही वर्षांपासून तो 30 वर्षीय नितूसोबत राहत होता. पण नितूला रोहित नावाचा 18 वर्षीय बॉयफ्रेंडही आहे. एवढेच नव्हे तर नितूच्या शेजारी राहणारी 32 वर्षीय महिला आशा हिचाही तो बॉयफ्रेंड आहे. काही वर्षांपूर्वी आशाच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याने ती घरी एकटीच राहते.
या घटनेचा क्रम पोलिसांनी सांगितला आहे. 2009 पासून योगेंदरसिंग आणि नितू लिव-इनमध्ये राहत होते. सुरवातीला सगळे आलबेल होते. पण नंतर त्याचे उत्पन्न कमी झाले. त्याच्यावर कर्जही वाढले. तो बराच पैसा ड्रिंकवर खर्च करीत होता. यावरुन दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यानंतर योगेंदर नितूला मारहाणही करीत होता. या दरम्यान नितू रोहितच्या प्रेमात पडली.
दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. रोजच्या भांडणाला कंटाळून नितूने योगेंदरसिंगला ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कट रचण्यात आला. यात आशालाही सामिल करुन घेण्यात आले.
काल (गुरुवार) योगेंदरसिंग रात्री 9.30 वाजता घरी परतला. त्यानंतर नितू त्याला घेऊन आशाच्या घरी आली. यावेळी रोहित आशाच्याच घरी होता. चौघांनी ड्रिंक घेतले. पण तिघांनी जरा मर्यादेत घेऊन योगेंदरला जास्त दारु घेण्याचा आग्रह केला. त्याचा तोल जात असल्याचे लक्षात आल्यावर तिघांनी त्याला पकडले. नितूने ओढळीने गळा आवळला. यावेळी रात्रीचे 12 वाजले होते.
त्यानंतर योगेंदरसिंगचा मृतदेह कारमध्ये टाकण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिघे सुमारे दोन-तीन तास दिल्लीच्या बाहेर फिरले. सकाळी 3 च्या सुमारास त्यांना दिल्ली जिल्ह्यातील सथियाबाद परिसरात एका जागा सापडली. मृतदेह फेकल्यानंतर दगडाने चेहरा विद्रुप करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी स्थानिकांनी सथियाबाद परिसरात अनोळखी मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी योगेंदरसिंगची ओळख पटवली. घरच्यांना याची माहिती दिली. त्यांनी तो नितूसोबत लिव-इनमध्ये राहत होता असे पोलिसांना सांगितले. पोलिसी खाक्या दाखविल्यावर नितूने सगळा घटनाक्रम सांगितला.
बातम्या आणखी आहेत...