आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bullettrain Live Narendra Modi Shinzo Abe Inaugurates Mumbai Ahmedabad Bullet Train Project Bullettrain

जपानचा \'ज\', इंडियाचा \'इ\' मिळून \'जय\' शब्द तयार होतो- अॅबे, जय जपान-जय हिंद!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान मोदींसह बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन केले. - Divya Marathi
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान मोदींसह बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन केले.
अहमदाबाद - जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि मोदी यांनी येथील साबरमती स्टेडियममध्ये बुलेट ट्रेन प्रोजेक्टची पायाभरणी केली. (असा असेल देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग; 7 किलोमीटर समुद्राखालून धावणार) या प्रसंगी शिंजो अॅबे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्काराने केली. अॅबे म्हणाले - माझे मित्र नरेंद्र मोदी एक वैश्विक नेते आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बुलेट ट्रेन आणि न्यू इंडियाचा निर्णय घेतला. मी आणि जपानी कंपन्यांनी त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली आहे.' त्यांच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भाषणे झाली. 
 
- 1.20 लाख कोटींचा हा प्रोजेक्ट 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबादचे 500 किमीचे अंतर 2 तासांवर येईल. 
अॅबे पुढे काय म्हणाले...
- शिंजो अॅबे म्हणाले - "जपान मेक इन इंडियासाठी तयार आहे. जर आमची टेक्नॉलॉजी आणि भारताच्या मनुष्यबळाने एकत्र काम केले तर भारत जगाचा कारखाना बनू शकतो. जपानच्या शिंकान्सेन सर्व्हिसमध्ये एकही अपघात झालेला नाही. आमचे रेल्वे प्रोजेक्टची एक टीम या वर्षी भारतात येईल आणि येथे सुरक्षेवर काम करणार आहे. मी आणखी एकदा सांगू इच्छितो की, जपान आणि भारताचे नाते ग्लोबल पार्टनरशिपच्या रूपात आहेत."
- "दोन्ही देश अनेक परंपरांवर विश्वास ठेवला जातो. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सर्व देश आपल्या संप्रभुतेसाठी काम करतात. जपानचा ज आणि इंडियाचा इ मिळवला तर हिंदीमध्ये जय शब्द तयार होतो. जय जपान, जय हिंद!" 
- "मी एअरपोर्टवर उतरलो तर खूप सुंदर दृश्ये दिसली. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा बुलेट ट्रेनच्या खिडकीतून मोदींसह ही दृश्ये पुन्हा पाहीन. मला गुजरात खूप पसंत आहे."
 
मेक इन इंडिया : संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्या येतील भारतात 
इंडाेनेशियातबुलेट ट्रेन चालवण्यात जपानला चीनकडून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत अॅबे शिंकासेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान निर्यात करण्याची तयारी करत अाहेत. जपानसमाेर भारताचा चांगला पर्याय अाहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात बुलेट ट्रेन चालवण्याची माेठी घाेषणा हाेऊ शकते. दाेन्ही पंतप्रधान इतरही अनेक प्रकल्प सुरू करतील. जपानसाेबत सैन्य सहकार्य वाढवण्यासह भारतास शस्त्रास्त्रे अन्य सामग्रीच्या स्थानिक निर्मितीवर भर देण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात मदत मिळण्याची शक्यता अाहे. त्यातून संरक्षण सामग्री बनवणाऱ्या जपानी कंपन्यांशी भारतात लढाऊ विमाने पाणबुड्या बनवण्याच्या प्रकल्पांवर चर्चा सुरू अाहे.
 
घेराबंदी : अाफ्रिकी काॅरिडाॅरद्वारे चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न 
भारतानेचीनच्या ‘वन बेल्ट-वन राेड’ (अाेबीअाेअार) प्रकल्पापासून स्वत:ला दूर ठेवले अाहे. या प्रकल्पाच्या प्रत्युत्तरादाखल भारताने अाफ्रिकी विकास बँकेच्या बैठकीत अाशिया-अाफ्रिका ग्राेथ काॅरिडाॅरचा शुभारंभ केला हाेता. हा माेदी अॅबे यांचा ड्रीम प्राेजेक्ट अाहे. या दाैऱ्यात अॅबे या प्रकल्पाशी निगडित अनेक करार करू शकतात. या माध्यमातून भारत जपान हे दाेन्ही देश अाशिया अाफ्रिकन देशांमध्ये क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करू इच्छित अाहेत. या प्रकल्पांतर्गत भारत जपान साेबत राहून अाफ्रिका, इराण, श्रीलंका दक्षिण-पूर्व अाशियात अनेक पायाभूत प्रकल्पांवर काम करत अाहेत.
 
16व्या शतकातील सिदी सय्यद मशिदीतही जातील माेदी आणि अॅबे 
माेदीअॅबे हे अहमदाबादमधील प्रसिद्ध सिदी सय्यद मशिदीतही जातील. या 16व्या शतकातील मशिदीत माेदी हे शिंजाे यांच्या गाइडची भूमिका निभावतील. संध्याकाळी सात वाजता सूर्यास्तावेळी फाेटाे शूट हाेणार अाहे.
 
बुलेट ट्रेनचा 25 टक्के खर्च महाराष्ट्र शासन करणार 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. काल मंत्रीमंडळाच्या उपसमितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के खर्च राज्य शासन करणार असून, यासाठीच्या तीस हजार कोटी रुपयांच्या निधीसाठीही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...