आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया म्हणाल्या, मोदींना काहीही म्हणू द्या, PM म्हणाले होते- मनतंत्राने देश चालत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांचा हा फोटो 2014 मध्ये दिल्लीतील रामलीलेवेळचा आहे. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांचा हा फोटो 2014 मध्ये दिल्लीतील रामलीलेवेळचा आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडेतोड टिका केली आहे. त्या म्हणाल्या, 'त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे.' मोदींनी गुरुवारी एका कार्यक्रमात संसदेतील गोंधळावर टिप्पणी केली होती. देश मनतंत्राने चालत नसल्याचे ते म्हणाले होते.

आज काय झाले संसदेत
>> संसदेच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. राज्यसभेत विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. दुपारपर्यंत दोनवेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागेल.
>> लोकसभेत गदारोळातच प्रश्नोत्तरांचा तास झाला.

काय म्हणाले होते मोदी
>> संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरु असलेल्या गदारोळावर मोदी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलले होते.
>> ते म्हणाले होते, 'यावेळी संसदेचे कामकाज होत नसल्याने गरीबांचे हक्क रखडले आहेत. आज देशासमोर दोन संकटे आहेत, एक मनतंत्र आणि दुसरे मनीतंत्र. मनतंत्रांना देश चालत नाही आणि मनीतंत्रापासून लोकशाही वाचवायची आहे. जीएसटी येईल तेव्हा येईल पण संसद तर चालली पाहिजे.'
जीएसटीवर पुढील आठवड्यात चर्चा
>> केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसभेत जीएसटीवर पुढील आठवड्यात चर्चा होऊ शकते.
>> पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासोबत बैठक केली.
>> नायडूंनी जीएसटी विधेयकाबद्दल गुरुवारी सायंकाळी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्यासोबत तर, समाजवादी पक्ष नेते रामगोपाल यांच्यासोबत आज चर्चा करणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोनिया आणि मोदींचे फोटो