आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसद : काँग्रेसची व्ही.के. सिहांच्या बरखास्तिची मागणी, आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या दलितांना कुत्रे संबोधणाऱ्या वक्तव्यावरुन काँग्रेसने सोमवारी संसद परिसरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरु केले. काँग्रेसने सिंह यांना बर्खास्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु आहे.

व्ही. के. सिंह यांना हटवण्याची मागणी
- केंद्रीय परराष्ट्र मंत्री व्ही. के. सिंह यांनी हरियाणातील फरिदाबाद येथील दलित जळितकांडानंतर वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, होते, 'जर कुत्र्याला दगड मारला तरी त्याला पंतप्रधान जबाबदार राहातिल का ?'

त्यांच्या या वक्तव्याला हरियाणातील दलित कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता, हा संदर्भ होता. या घटनेत दोन चिमुरड्यांचा मृत्यु झाला होता. मेणबत्तीप्रमाणे दोन मुले आगीत होरपळली होती.

सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि सभागृहातून त्यांना बर्खास्त करण्याची मागणी केली आहे.
केवळ दलितांना कुत्रा म्हणूनच सिंह थांबले नव्हते तर त्यांनी फेसबुक पेजवर राज्यसभा सदस्यांवर एक पोस्ट टाकली आणि राज्यसभा सदस्यांचे राजकारण हे उंदरा-मांजराचा खेळ असल्याचे म्हटले होते.

काय झाले मागील आठड्यात
- संसदेत मागील आठवड्यात व्ही. के. सिंह आणि कुमारी शैलजा यांच्यात मंदिरात जात विचारण्याच्या मुद्दयावरुन राज्यसभेत जोरदार शाब्दिक चकमक झाली होती.
- केंद्र सरकारला या अधिवेशनात जीएसटी विधेयम मंजूर करुन घेण्याची घाई आहे. 23 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते मंजूर व्हावे अशी सरकारची इच्छा आहे.

आज सकाळी काय झाले
- सोमवारी सकाळी 10 वाजता दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यात राहुल गांधी देखिल सहभागी होते.
- दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक केली. यात सभागृहात जीएसटी विधेयकासह इतर मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चे संदर्भात बातचीत केली.