आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती; काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली, भाजपची ताकत वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपतिपदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी ६५.६५ टक्के मते मिळवून विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे २५ जुलै रोजी सकाळी त्यांना भारतीय लोकशाहीतील या सर्वोच्च पदाची शपथ देतील.
 
दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत कोविंद यांच्या बाजूने झालेले क्रॉस व्होटिंग लक्षवेधी ठरले. विशेषत: महाराष्ट्रातील क्रॉस व्होटिंगमध्ये भाजप-शिवसेनेव्यतिरिक्त कोविंद यांना मिळालेली विरोधी पक्षांतील मते म्हणजे शिवसेनेशिवाय फडणवीस सरकार स्थिर राहू शकते, याचे संकेत मानले जात आहेत.

माजी राष्ट्रपती नारायणन यांच्यानंतर राष्ट्रपतिपदी निवडून आलेले कोविंद दुसरे दलित नेते आहेत. भाजपच्या ३७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पक्षातील एखादा सदस्य देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान झाला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परोंख हे कोविंद यांचे मूळ गाव आहे.

कोविंद यांच्या बाजूने
भाजप, तेदेपा, शिवसेना, जदयू, अण्णाद्रमुक, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, इंनॅलोकदल व एनडीएचे घटक पक्ष. शिवाय सपाचा मुलायम व शिवपाल यांचा गट. मीरा कुमार यांच्या बाजूने : काँग्रेस, राजद, एनसीपी, डावे पक्ष, तृणमूल, आपसह १८ विरोधी पक्ष.

संसदेतील मतदान
- ७६८ खासदारांनी मतदान केले. (मूल्य : ५,४३,७४४)
- ५२२ मते कोविंद यांना पडली. (मूल्य : ३,६९,५७६)
- २२५ मते मीरा कुमार यांना मिळाली. (मूल्य : १,५९,३००)
- २१ मते अवैध ठरली. (मूल्य : १४,८६८)

राज्यातील मतदान
- एकूण मते : ४,०८३ (मूल्य : ५,४६,५५६)
- कोविंद यांना : २४०८ (३,३२,४६८)
- मीरा कुमारना : १६१९ (२,०८,०१४)
- अवैध ठरली ५६ मते. (६,०७४)

पुढील स्लाइडवर वाचा... पावसात घर गळायचे, आजही असे कितीतरी कोविंद देशात असतील...
हेही वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...