आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE Report on Diwali: 6200 फूट उंचीवर येथे श्रीलंकेत वसली आहे एक अयोध्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतेला रावणाने जिथे 11 महिने कैदेत ठेवले होते. त्या स्थानी 'दिव्य मराठी' आपल्याला घेऊन जात आहे. आता तिथे सीतामात्रा मंदिर असून आजही दिवाळी साजरी होते.

जेथून भगवान रामाने युद्ध जिंकून सीतेला मुक्त केले होते, अयोध्येकडे पहिले पाऊल टाकले होते. ‘दिव्य मराठी’ दोन्ही ठिकाणी पोहोचला आणि या वेळी दिवाळी कशी साजरी होत आहे याची माहिती घेतली. श्रीलंका आणि अयोध्या येथून दोन विशेष वृत्तांत...


6200 फूट उंचीवर येथे लंकेत वसली आहे एक अयोध्या

आम्ही उभे आहोत. समुद्र सपाटीपासून 6200 फूट उंचीवर. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून 175 किमी दूर. नुवारा एलियात. तेथे सीता माता मंदिरात पोहोचलो. हा भाग श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे.

या दूरवरच्या भागात जमलेल्या तामीळ भाविकांपैकी कोणालाही हिंदी समजत नाही. पण हनुमान चालिसाच्या पाठामुळे अयोध्येची अनुभूती येते. हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीचे आहे. विशेष पूजेची तयारी सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काल येथे दिवसभर पाऊस होता. हिंदी आणि तमीळमध्ये राम, सीता, हनुमानाचा जयघोष कडाक्याच्या थंडीच अमृतानुभव देत आहे. रावणाने सीतेचे हरण करून तिला येथेच ठेवले होते हे ऐकून आम्ही येथे आलो. समोर गगनचुंबी पर्वतावर अशोक वाटिका होता. हे एकमेव मंदिर आज लंकेत सीतेच्या उपस्थितीचे प्रतीक बनले आहे. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती पाच हजार वर्षांपूर्वीच्या आहेत, असे पुरोहिताने सांगितले. श्रीलंका सरकारने हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले आहे. दररोज शेकडो भारतीय येतात. आता आरती सुरू झाली आहे. आम्हीही तीत सहभागी होत आहोत.

गुजरात आणि दिल्लीहून आलेल्या अनेक भाविकांची भेट घेतली. आता रात्र झाली आहे. बाहेर वेगाने वारे वाहत आहेत. दिवसा दाट हिरवळीच्या पृष्ठभूमीवर मंदिराचे रूप अगदी वेगळे भासते. सीता अशोक वाटिकेतून जेथे स्नानासाठी येत असे त्या पहाडी झऱ्याचा आवाज सायंकाळी सतत येत आहे.

येथेच सीता करत होती श्रीरामाच्या आगमनाची प्रार्थना
हे छायाचित्र श्रीलंकेतील सीता माता मंदिराचे आहे. येथेच रावणाने सीतेला बंदी बनवले होते. येथेच सीता-रामाच्या आगमनासाठी प्रार्थना करत होती. तेथे भव्य मंदिर बनवण्यात आले आहे. श्रीलंका सरकारने त्याला आता पर्यटनस्थळ केले आहे. येथे सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिर 500 एकरांच्या अशोक वाटिकेचा एक भाग आहे. तेथे मुरारी बापूंची रामकथाही झाली आहे. स्थानिक तामिळ खासदार आणि 30  हजार तामिळ नागरिकांनी मंदिर बनवण्यास मदत केली. त्यानंतरच एकेकाळी ‘लिटिल इंग्लंड’ म्हटला जाणारा हा भाग आता छोटी अयोध्या झाला आहे.
(छायाचित्र: ताराचंद गवारिया) 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...शरयूतीरी प्रचंड उत्साह, जणू आजच श्रीराम परतले, त्रिभुवन यांचा वृत्तांत थेट अयोध्येतून...
बातम्या आणखी आहेत...