आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाचा पाय खोलात, 2 मर्डर केसची सुनावणी सुरु; राम रहिमविरोधात साक्ष देणार ड्रायव्हर खट्टासिंह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला/रोहतक - डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य रणजीत सिंह आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती मर्डर केसची पंचकुला सीबीआय कोर्टात शनिवारी अखेरची सुनावणी होत आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने पंचकुलामध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. या दोन्ही प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि साध्वी बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेला राम रहिम आरोपी आहे. दरम्यान, राम रहिमचा ड्रायव्हर खट्टासिंहने म्हटले आहे की तो बाबाविरोधात जबाब नोंदवणार. 2012 मध्ये खट्टाने आपला जबाब फिरवला होता.  
 
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राम रहिमची सुनावणी
सुरक्षेच्या कारणामुळे राम रहिम सुनारिया जेलमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजर राहील, असे हरियाणाच्या डीजीपींनी सांगितले आहे. दरम्यान, जेल आणि पंचकुलामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, फरार हनीप्रीतचा ड्रायव्हर प्रदीप याला राजस्थानमधील लक्ष्मणगड येथे अटक करण्यात आली आहे. तो सालासार येथे लपून बसला होता. राम रहिमला पंचकुला सीबीआय कोर्टाने 25 ऑगस्ट रोजी दोन साध्वींच्या बालात्कार प्रकरणी दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 
 
पत्रकार रामचंद्र छत्रपती मर्डर केस 
- सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या मर्डर केसमध्ये राम रहिम आरोपी आहे. छत्रपती यांनी त्यांच्या सांय दैनिकात डेरातील कृष्णकृत्य सर्वप्रथम प्रकाशित केले होते. 
- डेऱ्यातील साध्वींच्या बलात्कार प्रकरणालाही छत्रपती यांनीच वाचा फोडली होती. डेऱ्यामध्ये साध्वींवर अत्याचार होत असल्याची पहिली बातमी छत्रपतींनी प्रकाशित केली होती. 
- छत्रपतींच्या 'पूरा सच' या वृत्तपत्रात डेरा  आणि राम रहिम विरोधात बातम्या आल्यानंतर दोन भाडोत्रीं गुंडांकडून  24 ऑक्टोबर 2002 रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती.
- छत्रपती यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एका आरोपीला जागेवरच पकडण्यात आले तर दुसऱ्याला नंतर पकडण्यात आले. 
- 21 नोव्हेंबर 2002 रोजी छत्रपती यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात राम रहीम आरोपी आहे.
 
रणजीतसिंह मर्डर केस 
- हे प्रकरणही साध्वी अत्याचारासंबंधीचेच आहे. 
- रणजीत हा डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो राम रहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला राम रहीम याचे सारे कारनामे माहित होते. त्याचा 10 जुलै 2003 मध्ये खून करण्यात आला. राम रहीम या प्रकरणातही आरोपी आहे.
 
राम रहिमच्या निकटवर्तीयाला 7 दिवसांची कोठडी
- राम रहिमचा निकटवर्तीय समजला जाणारा दिलावरसिंह इन्सा याला शुक्रवारी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
- पंचकुला पोलिसांच्या एसआयटीने त्याला गुरुवारी सायंकाळी सोनीपत येथून अटक केली होती. 
 
राम रहिमला बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा 
- 2002 मध्ये एका साध्वीने निनावी चिठ्ठी लिहिली होती. त्यात तिने डेऱ्यात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केला होता. 
- तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना लिहिलेल्या या पत्राची एक प्रत पंजाब-हरियाणा हायकोर्टाला पाठवण्यात आली होती. यामध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमवर आरोप करण्यात आला होता. 
- पत्र हायकोर्टात पोहोचल्यानंतर डेरा प्रमुखाविरोधात लैंगिक शोषणाचा खटला सुरु झाला होता. तपास सीबीआयला देण्यात आला. 
- 15 वर्षानंतर 25 ऑगस्ट 2017 रोजी सीबीआय कोर्टाने राम रहिमला दोषी ठरविले आणि 28 ऑगस्ट 2017 रोजी दोन बलात्कारांसाठी प्रत्येकी 10-10 वर्षांची एका पाठोपाठ शिक्षा भोगण्याचा निर्णय दिला. 
- असे म्हटले जाते की हे पत्र बाबाचा मॅनेजर राहिलेल्या रणजीतसिंहच्या बहिणीने लिहिले होते. 20 वर्षे बाबाची सेवा केलेल्या रणजितचा नंतर खून झाला होता. त्याच्या खूनाचा आरोप बाबासह त्याच्या समर्थकांवर आहे. 
बातम्या आणखी आहेत...