आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Delhi Assembly Election Results 2015 | Delhi Election Result 2015 In Marathi| Delhi Election Result In Marathi| Election Results 2015

Delhi Results:आपच्या विधीमंडळ नेतेपदी केजरीवाल यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने (आप) नवा विक्रम केला आहे. देशात सगळ्यात मोठा विजय मिळवला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 67 जागांवर जवळपास विजय मिळवला आहे. मंगळवारी सायंकाळी आपच्या विधीमंडळ नेतेपदी केजरीवालांची निवड करण्यात आली आहे.

'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी भेटीसाठी वेळ मागितला आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करावा, अशी मागणी केजरीवाल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी फोन करून केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय योगगुरु रामदेव यांनी देखील केजरीवाल यांनी अभिनंदन केले आहे.

भाजपचा आशेचा किरण मावळला...
दुसरीकडे भाजपचा आशेचा 'किरण' देखील मावळला आहे. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदींचा नामुष्कीजनक पराभव झाला आहे. कृष्णानगरातून 'आप'चे उमेदवार एस.के.बग्गा यांनी किरण बेदींचा पराभव केला आहे.

किरण बेदी सुरुवातीपासूनच पिछाडीवर होत्या. अखेर किरण बेदींचा 2277 मतांनी पराभव झाला. (विजयी उमेदवारांची नावे पुढील स्लाइड्वर)

दिल्लीकरांचा विजय...
'हा अद्भूत विजय दिल्लीतील जनतेचा आहे. मात्र, विजयाचा अहंकार बाळगू नका. कारण याच अहंकारामुळेच भाजप, काँग्रेसचा पराभव झाल्याचे 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे.

'आप' हा दिल्लीतील सगळ्यात मोठा पक्ष ठरल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या 14 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. याच दिवशी विश्वचषक सुरु होत आहे. 15 फेब्रुवारीला भारतविरुद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे.

भ्रष्टाचार आणि व्हीआयपी कल्चर संपुष्टात- केजरीवाल
दिल्लीतील भ्रष्टाचार आणि व्हीआयपी कल्चर संपुष्टात आले आहे. मी जनतेचा मुख्यमंत्री बनणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवालांचे अभिनंदन केले आहे. दिल्लीच्या विकासासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देखील मोदींनी केजरीवाल यांना दिले आहे.

संपूर्ण श्रेय केजरीवालांना...
तसेच दिल्लीतील विजयाचे संपूर्ण श्रेय केजरीवालांना असल्याचे सांगत भाजपच्या नेत्या आणि माजी सहकारी किरण बेदी यांनी केजरीवालांचे अभिनंदन केले आहे. तसेच दिल्लीला 'वर्ल्ड क्लास सिटी' बनवा, असे किरण बेदींनी म्हटले आहे. किरण बेदी यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे.

नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दुसरीकडे, दिल्लीत भाजपचा नामुष्कीजनक पराभव होत असल्यामुळे दिल्ली विधानसभेत भाजपला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही.
दिल्लीतील अनेक दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर 'प्रियांका लाओ, कॉंग्रेस बचाओ'च्या घोषणाबाजी केली जात आहे.

दिल्ली निवडणुकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबतचा जनमताचा कौल म्हणूनही पाहिले जात होते. त्यामुळे निकालाला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, नरेंद्र मोदींचा रथ रोखण्यात अरविंद केजरीवाल यांना यश आले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. गेल्या 16 वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर असलेल्या भाजपने अण्णा हजारे यांच्या टीममधील सहकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर करून डाव लावला होता. मात्र, हाच डाव आता भाजपच्या अंगाशी आला आहे.

दुसरीकडे, दिल्लीकरांनी यावेळी देखील कॉंग्रेसला स्पष्ट नाकारल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. अजय माकन यांनी कॉंग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असून पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

...तर मोदी, शहांनी राजीनामा द्या : काँग्रेस
दिल्ली विधानसभेची निवडणूक मोदी सरकारवरील जनमताचा कौल असून या निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अजॉय कुमार यांनी यापूर्वी केली होती.

निकाल हाती नाही, नाराज का होऊ : बेदी
ईश्वराच्या इच्छेप्रमाणे मी मला शक्य तितका वेळ दिला आहे.निवडणुकीचे निकाल काही माझ्या हाती नाहीत. ‘कर्म’ माझ्या हाती आहे, ते मी केले आहे, असे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी म्हटले होते. मात्र ते आता फोल ठरले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा विजयी उमेदवारांची नावे आणि 'आप'च्या जल्लोषाची छायाचित्रे...