आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्चीच्या मोहात अखिलेश काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, पंतप्रधान मोदींचा हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखीमपूर खीरीमध्ये रॅलीदरम्यान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
लखीमपूर खीरीमध्ये रॅलीदरम्यान नरेंद्र मोदी.
लखीमपुर खीरी - नरेंद्र मोदींनी सोमवारी झालेल्या एका निवडणुकीच्या प्रचार सभेत अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. यूपीमध्ये अखिलेश सरकार सुधरायला तयार नाही. यूपीच्या सरकारने तर राममनोहर लोहियांनाही सोडले नाही, त्यांचाही अपमान केला, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली तर, सहा महिन्यांत सर्व गुन्हेगार तुरुंगात असतील. इथेच मी जनतेला हे वचन देतो. या भागात 15 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने संध्याकाळी, 5 वाजता प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे. 

आणखी काय म्हणाले मोदी.. 
- मोदी म्हणाले, पराभवाच्या भितीने आणि खुर्चीच्या मोहात अखिलेश काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. या निवडणुकीत त्यांनी कामाचा हिशेब द्यायला हवा. 
- राममनोहर लोहिया आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात लढत होते, त्यांच्या बरोबर जाऊन सपाने लोहिया- जयप्रकाश नारायण यांचा अपमान केला आहे. पश्चिम यूपीमध्ये सपा-बसपा-काँग्रेसला धडा शिकवेल असे मतदान झाले आहे. 
- आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आले तेव्हा दर आठवड्याला नवीन जाहीरनामे येऊ लागले आहेत. नवीन नवीन मुद्दे टाकून आपली इज्जत टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
- आणीबाणीत इंदिरा गांधींनी 20 मुद्दे काढले होते, यूपीमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. आता त्यांनी 10 मुद्दे आणले आहेत. 

केवळ फित कापून काही होणार नाही 
- ते लोक कामाचा हिशेब देत आहेत का. अखिलेशने मेट्रोचे तिकिट घेऊन एक चक्कर मारून यावी. पण त्यांनी फक्त फित कापली. अजून स्टेशन तयार नाहीत किंवा दुसरेही काही झालेले नाही. 
- पैसा केंद्राने दिला पण कार्यक्रमाला लखनौच्या खासदारालाही बोलावले नाही. उत्तर प्रदेशात सोन्याची चेन घालून फिरणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत. 
- ज्या यूपीमध्ये दररोज रेप, 12, 15, 17 हत्या होतात, तुरुंगातील कैदी गँग चालवतात, त्याला तुम्ही अखिलेशची कामे म्हणाल की, कारनामे. 
- हिंदुस्तानातील सर्वात मोठे राज्य गुंडांच्या ताब्यात जाईल, आम्हाला संधी द्या, 6 महिन्यांत गुन्हेगारांना तुरुंगात डांबले नाही तर, सांगा. 

2 आठवड्यांत ऊस उत्पादक शेककऱ्यांची थकबाकी माफ करणार
- माय लेकी सुरक्षितपणे फिरू शकतील असा एकही बाग यूपीमध्ये नाही. येथील लोक मेहनती आहेत, पण सरकारने गुन्हेगारांना संरक्षण दिल्याने सर्व उध्वस्त होत आहे. 
- साखरेची वाटी म्हणून प्रसिद्ध असलेला लखीमपुर जिल्हा आहे, येथील ऊस उत्पादकांनी थकबाकी रद्द करण्यास कोणी अडवले आहे. 
- भाजपच्या प्रदेशातील कार्यकरणीचे मी अभिनंदन करतो. त्याचे कारण म्हणजे 2 आठवड्यांत ऊसाची थकबाकी रद्द करण्याचे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात आहे.  
- छोट्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचनही आम्ही जाहीरनाम्यात दिले आहे. 
- यूपीने मला खासदार बनवले. पंतप्रधानही बनवले. देशाला 30 वर्षांनंतर स्थिर सरकार दिले. 

अखिलेशने घोटाळ्यांची चौकशी केली नाही 
- मोदी म्हणाले, मायावतींच्या कार्यकाळात साखर घोटाळ्याचे आरोप झाले होते. अखिलेश यांनी त्याच्या चौकशीचे आश्वासन दिले होते. पण चौकशी झालीच नाही. 
- सर्वात कमी जोखीम ही ऊसाच्या पिकाला असते पण यूपी सरकारने बळजबरी प्रधानमंत्री विमा योजनेत त्याचा समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यांवरील ओझे वाढले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...