आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GROUND REPORT:ढिगार्‍यांखाली जिवंत लोक, पुन्हा भूकंप अन् पाऊसही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हे छायाचित्र असोसिएटेड प्रेसचे छायाचित्रकार मनीष स्वरूप यांनी टिपले. त्यांनी ही माहिती काठमांडूहून - Divya Marathi
(हे छायाचित्र असोसिएटेड प्रेसचे छायाचित्रकार मनीष स्वरूप यांनी टिपले. त्यांनी ही माहिती काठमांडूहून
नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक पुढाकार
दै.'दिव्य मराठी' दर सोमवारी सकारात्मक वृत्तपत्र देते. परंतु जगातील सर्वात मोठ्या घटनेच्या वृत्तापासूनही वाचकांना वंचित ठेवू इच्छित नाही. नेपाळ उत्तर भारतात झालेल्या भीषण भूकंपाशी निगडित बातम्या देत आहोतच, जोडीला जिद्द आिण इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या व्यक्तिरेखा घेऊन आलो आहोत.'
नवी दिल्ली/काठमांडू - नेपाळ भारतात भूकंपाची मालिका रविवारीही कायम राहिली. दिवसभरात ३० पेक्षा जास्त धक्के बसले. त्यापैकी दोन धक्के तीव्र होते. रिश्टर स्केलवर ६.७ ६.५ तीव्रतेचे. त्यांचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता तरी त्याचा परिणाम उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये झाला. एकूण परिस्थिती पाहून काठमांडू विमानतळ बंद करण्यात आले. सर्व उड्डाणे भारताच्या दिशेने वळवण्यात आली. दुपारी चार वाजता परिस्थिती सुरळीत झाली. पण रात्री पाऊस सुरू झाला. पुढील ४८ तास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येतील. दरडी कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये ढिगाऱ्यातून मृतदेह काढणे सुरूच आहे. बळींची संख्या २५०० वर गेली. हा आकडा १० हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी व्यक्त केली जात आहे. भारतातही बळींच्या एकूण संख्या ६८ वर गेली आहे.
तुफान हिमवादळात आम्ही बचावलो
आम्ही एव्हरेस्टवर कॅम्प-१ मध्ये होतो. अचानक सर्वकाही हादरले. काही कळायच्या आत समोरून हिमवादळ येत होते. आम्ही बाहेर आलो. तंबूच्या मागे धावलो. हवेचा स्फोट झाला. काही सेकंदाचे अंतर उरले असेल. हिमवादळ आम्हाला कापत गेले. मग बेसकॅम्प उद््ध्वस्त झाल्याची बातमी आली. हेलिकाॅप्टर जखमींना घेऊन गेले. आम्हाला जेवण मिळाले. शेर्पा आश्चर्यकारकरीत्या धाडसी आहेत. आम्हीही ठीक आहोत.- ब्रिटिश जोडपे, अॅलेक्स नीदर सॅम शॅपे

ढिगाऱ्यांत दुसऱ्या दिवशी १२ जण जिवंत
कालंकी येथे मजली लुंबिनी गेस्ट हाऊस कोसळले. रविवारी मदतकार्य सुरू झाले. ढिगारे उपसताना एक मृतदेह मिळाला. पण त्याच्याजवळच बेशुद्ध पडलेल्या एकाचा श्वास सुरू होता. काँक्रीटच्या ढिगाखाली दोघे दबले होते. वर लोखंडी बीम होते. त्याचे पाय आणि मागचा भाग चेपला गेला आहे. सायंकाळपर्यंत १२ जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात आले, परंतु अजून २० जण दबले असण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधिकारी आर.पी. धामला यांनी सांगितले.
मुलीच्या भेटीने जगण्याची उमेद, दु:ख विसरले
हे आहेत सुरेश परिहार. त्यांच्या कुशीत आहे आठ महिन्यांची कन्या संध्या. संध्या आईसह रविवारी वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती. सुरेश म्हणाले, "भूकंप झाला तेव्हा मी घराबाहेर होतो. ज्या इमारतीत होतो ती कोसळली. अनेक लोक अडकले. अनेकांचा मृत्यू झाला. मीही जखमी झालो. परंतु वाचलेल्यांनी मला ढिगाऱ्याखालून काढले रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे जीव वाचला. नाही तर मेलोच असतो. घरी सर्व सुरक्षित आहेत.'
बाइकर्सनी वाचवला प्रमिला यांचा जीव
ही आहे प्रमिला नेपाळी. घराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. मोहिमेवरून परतणाऱ्या नॅशनल माउंटन बाइकर्सच्या पथकाचे लक्ष गेले. तेव्हा सर्वांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
२४ तास मित्राच्या मृतदेहाखाली...
स्वयंभूनाथ स्तुपाजवळ यांचे घर होते. राेजच्याप्रमाणे मित्रासोबत शनिवारी गप्पा मारत बसलो असता भूकंप झाला. घर कोसळले. दोघेही गाडलो गेलो. मित्र गेला. दुसऱ्याला २४ तासानंतर वाचवण्यात आले.
स्वत:ला वाचवले
गुगलने ४४०० लोकांना ट्रॅक केले : गुगलपर्सन फाइंडरद्वारे रविवारी रात्रीपर्यंत ४४०० लोकांचे रेकॉर्ड एकत्रित करण्यात आले आहे. हैतीत २०१० मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी पर्सन फाइंडर लाँच करण्यात आले होते.
फेसबुकचे सेफ्टी चेक : हेचेक भूकंप झालेल्या भागातील लोकांना त्यांचे सेफ्टी स्टेटस अपडेट करण्यास सांगते. या टूलद्वारे तुम्ही ‘मी ठीक आहे,’ असे आपल्या मित्रांना आणि ओळखणाऱ्या व्यक्तींना सांगू शकता.
दुसऱ्या दिवशीही भारतात धक्के
{ताज्या धक्क्यांनंतर दिल्ली कोलकात्यात मेट्रो बंद करावी लागली.
{दिवसभरात ३० पेक्षा जास्त धक्के. सर्वांत मोठा धक्का ६.७ तीव्रतेचा.
{वैज्ञानिकांच्या मते, भूकंपाचे लहानमोठे धक्के बसतील.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
(हे छायाचित्र असोसिएटेड प्रेसचे छायाचित्रकार मनीष स्वरूप यांनी टिपले. त्यांनी ही माहिती काठमांडूहून "दिव्य मराठी नेटवर्क'ला सांगितली.)