आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ना गोली से, ना गाली से.. समस्या का हल होगा काश्मीरी लोगो को गले लगाने से\' : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत नवा भारत घडविण्याचे आवाहन केले. - Divya Marathi
पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत नवा भारत घडविण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली-  देशवासियांकडून स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन करतानाच नवीन भारताचा संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना म्हटले आहे.  लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते देशवासियांना संबोधित करत आहेत. 
 
हा देश बुद्धाचा आहे, महात्मा गांधींचा आहे. त्यामुळे आस्थेच्या नावावर हिंसेच्या मार्गाला बळ दिले जाणार नाही. देशात कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असे सांगतानाच पूर्वी 'भारत छोडो'चा नारा होता, आता न्यू इंडिया घडवताना आम्ही 'भारत जोडो'चा नारा देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. यात 1 लाख लोकांनी करचुकवेगिरी करुन हा पैसा दडवला होता. तसेच नोटाबंदीमुळे 3 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
देशाच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. 'चलता है...' ची मानसिकता बदलावी लागणार, 'हे होऊ शकते..हे घडू शकते' असा सकारात्मक विचार मनात ठेवावा लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.  सरकारने 800  कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली असल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या देशात जीएसटी लागू झाल्याचे जगात आश्चर्य व्यक्त होत आहे.  देश प्रगतीपथावर आहे, गरिबांची प्रगती होत आहे. दहशतवादाविरोधातील आपल्या लढाईला जगभरातून पाठिंबा, सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. शौर्य पदक विजेत्या वीरांची माहिती देणारे संकेतस्थळ सुरू करणार, असल्याची माहितीही त्यांनी दिली. 'ना गोली से, ना गाली से.. समस्या का हल होगा काश्मीरी लोगो को गले लगाने से' अशी काश्मीरबाबतची भूमिका त्यांनी मांडली.
 
नैसर्गिक आपत्तींशी तोंड देत शेतकऱ्यांनी धान्यांचे विक्रमी उत्पादन केले. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. युवकांनी रोजगार निर्मिती करावी, मुद्रा योजनेतून अनेक युवकांनी नवीन उद्योग सुरू करुन रोजगार दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...