आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल म्हणाले, \'नोटबंदीवर संसदेत बोललो तर भूकंप येईल\'; संसद बुधवारपर्यंत तहकूब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीच्या निर्णयावर सरकार मला संसदेत बोलण्याची परवानगी देत नाही. परंतु हा इतिहासातील ‘सर्वात मोठा घोटाळा’ असून त्याबद्दल बोललो तर ‘भूकंप’ येईल, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर संसदेत चर्चा घडून यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. चर्चेमधूनच सत्य समोर येणार आहे. परंतु सरकार त्यापासून दूर पळत आहे. चर्चा करण्याची दर्शवली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आसनावर नीटपणे बसून ऐकूही शकणार नाहीत. इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप राहुल यांनी शुक्रवारी केला. संसदेबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.

नोटबंदीच्या निर्णयावर शुक्रवारी काँग्रेसने लोकसभेत चर्चेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. परंतु काँग्रेसने या मुद्द्यावर संसदेचे कामकाज ठप्प केल्याबद्दल आधी देशाची माफी मागावी, अशी मागणी सरकारकडून करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते.

१६ दिवसांपासून गदारोळ
नोटबंदीच्या मुद्द्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला चांगले घेरले. त्यामुळे संसदेचे १६ दिवसांचे कामकाज पाण्यात गेले आहे. निवडक विधेयके सोडल्यास अपेक्षित कामकाज होऊ शकले नाही. गेली काही दिवस तर वादग्रस्त नोटबंदीच्या निर्णयावर चर्चादेखील होऊ शकली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. संसदीय कामकाजाचा दैनंदिन खर्च सुमारे ९ कोटी रुपये असतो.

राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आणखी तडे : भाजप
राहुल गांधी यांच्या भाषणामुळे काँग्रेसला आणखी तडे जाऊ लागले आहेत. संसद त्यांना आपल्या नियमाप्रमाणे चालवायची आहे. परंतु संसद राज्य घटनेनुसार चालत असते, अशा शब्दांत भाजपने राहुल यांच्या वक्तव्यावरील प्रतिक्रिया दिली आहे. काळ्या पैशांच्या बाबतीत काँग्रेस पक्ष आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. तेच आता ६० वर्षांनंतर भूकंपाची भाषा करू लागले आहेत, असा टोला भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला. आमचा पक्ष अशा वक्तव्याला भीत नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. तेच चर्चेपासून दूर पळू लागले आहेत, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

चार दिवस सुटीचे, उरले तीन कामाचे
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळात गेला. आता चार दिवस सुटीचे आहेत. पुढल्या आठवड्यात १६ डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. त्यामुळे कामकाजाचे केवळ तीन दिवस बाकी आहेत.

आणखी काय म्हणाले राहुल गांधी
- आमची इच्छा आहे की सरकारने आमच्यासोबत सभागृहात चर्चा करावी. आम्ही नीर क्षीर न्यायाने चर्चा करण्यास तयार आहोत.
- पंतप्रधान देशभर फिरत आहेत. सभांमधून बोलत आहेत.
- पंतप्रधान लोकसभेत येण्यास घाबरात आहेत.
- नोटबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
- लोकसभेत नोटबंदीवर बोलायचे आहे. मला बोलू दिले जात नाही.
- भारतातील गरीब माणसाच्या मनात काय आहे ते सभागृहात बोलणार आहे.

सरकार म्हणाले- जनतेचा पैसा वाया घालवण्याऱ्या विरोधी पक्षाने माफी मागावी
- काँग्रेसने लोकसभेत मतदानाच्या नियमानुसार चर्चेची मागणी केली आहे.
- काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र लोकांना जो त्रास होत आहे. त्यावर चर्चा करण्याची तयारी आहे.
- दुसरीकडे, संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार म्हणाले, विरोधक बहुमत असलेले सभागृह चालू देत नाहीत.
- 16 दिवस वाया घालवले गेले. जनतेचा पैसा वाया घालवण्यात आला. यासाठी विरोधकांनी जनतेची माफी मागितली पाहिजे.
- दुसरीकडे, राज्यसभेत सीताराम येचुरी म्हणाले, 'सरकारला मान्यच करावे लागेल की हा देशद्रोही निर्णय आहे.'
- कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधीपक्ष सदस्यांची बैठक झाली.

घोषणाबाजी - सरकार शेतकरी विरोधी
- शुक्रवारी राज्यसभेत सरकारविरोधात घोषणाबाजी झाली.
- विरोधीपक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. शेतकरी विरोधी सरकर अशा घोषणा देण्यात आल्या.
पुढील स्लाइडमध्ये, राष्ट्रपती म्हणाले- ईश्वरासाठी काम करा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...