आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी शरीरात तयार केला लिव्हर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डॉक्टरांनी स्टेम सेलच्या मदतीने मानवी शरीरामध्ये नव्याने लिव्हर तयार करण्यात यश मिळवले आहे. हे यश लिव्हर निकामी झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. एका नव्या संशोधनानुसार, लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता असलेल्या 60 टक्के रुग्णांना याचा फायदा झाला आहे. या उपचारासाठी खर्चही 50 हजारांपेक्षा कमी येतो, हे विशेष.

या नव्या संशोधनास बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि सायन्स व टेक्नॉलॉजी मिनीस्ट्रीने संशोधनास मंजुरी दिली आहे. संशोधन पेपरचे मुख्य लेखक आणि गंगाराम हॉस्पिटलच्या गॅस्ट्रालॉजी विभागाचे डॉ. अनिल अरोडा यांनी सांगितले की, लिव्हर निकामी होण्याचे रुग्णांचे वाढते प्रमाण आणि त्यांच्या बदलासाठी होणारा महागडा खर्च लक्षात घेता आम्ही हा नवा पर्याय उभा केला आहे. या मानवाच्या शरीरामध्ये उपलब्ध स्टेम सेलच्या माध्यमातून लिव्हरवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेम सेलचे काम शरीर दुरुस्त करणे आहे. रक्ताच्या सोबत तो शरीरामध्ये प्रत्येक जागी प्रवाहित होतो. जेथे डॅमेज आहे, तेथील कमी तो पूर्ण करतो. बोन मॅरोमध्ये असे स्टेम सेल्स असतात. त्यांना बोन मॅरोतून घेऊन लिव्हरच्या आकारात तयार केले जाते. अभ्यासादरम्यान बोन मॅरोला एका इंजेक्शनच्या माध्यमातून वाढवले गेले. हे इंजेक्शन लिव्हरच्या सर्व रुग्णांना पाच दिवस दिले गेले. त्यामुळे बोन मॅरोच्या काही सेल्स वाढवण्यास मदत झाली.