आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liver Donation Has No Problem Of Different Blood Groups

रुग्ण व दात्याचे रक्तगट वेगळे असले तरी यकृत प्रत्यारोपण शक्य, दिल्लीत यशस्वी प्रत्यारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्हाला यकृताचा आजार असेल आणि तुमच्या रक्तगटाचे दाते मिळत नसतील तर आता चिंता करण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या रक्तगटाचे दाते आता कोणालाही यकृत दान करू शकतील, असे तंत्रज्ञान डॉक्टरांनी शोधून काढले आहे. दिल्लीत याची यशस्वी चाचणीही पार पडली आहे.

दिल्ली सरकारच्या यकृत तसेच पित्त विज्ञान संस्थेने (आयएलबीएस) नुकतेच दोन रुग्णांना अन्य रक्तगटाच्या दात्याचे यकृत बसवले आहे. आयएलबीएस प्रशासनानुसार, असमान रक्त गटाच्या दात्यांचे यकृत या रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले आहे. यापैकी एका रुग्णाला मागच्या तीन आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून दुसरा रुग्ण आताही रुग्णालयातच आहे.

यकृत रुग्णांसाठी वरदान
यकृताअभावी प्राणास मुकणा-या रुग्णांसाठी हे वैद्यकीय शास्त्रातील यश वरदान ठरणार आहे. वेळेवर दाता न मिळल्याने बहुतांश रुग्णांचे यकृत प्रत्यारोपण होत नाही. सारख्या रक्तगटाचा दाता शोधण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना ब-याच हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे या नवीन संशोधनाने आता दाता शोधणे सोपे झाले आहे.

१५.५० लाख रुपयांचा खर्च येणार
आयएलबीएसमध्ये प्रत्यारोपणासाठी रुग्णास ११.५० लाख रुपये खर्च करावे लागते. नव्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रत्यारोपणासाठी १५.५० लाखांपेक्षा अधिक खर्च होईल. खासगी रुग्णालयांत जास्त खर्च असू शकतो. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात या तंत्रज्ञानाने ३ रुग्णांचे यकृत प्रत्यारोपित करण्यात आले आहे.

प्रत्यारोपणापूर्वी प्रक्रिया
यकृत तसेच पित्त विज्ञान संस्थेचे प्रमुख यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. व्ही. पामेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या रुग्णालयात प्रथमच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. रुग्ण आणि दात्याच्या रक्तातील फरक आधी तपासला जातो. त्यानंतर एका विशेष यंत्राच्या साहाय्याने रुग्णाचे रक्त शुद्ध करून रुग्ण व दात्याच्या रक्ताची गुणवत्ता एकसमान केली जाते. त्यानंतर यकृताचे प्रत्यारोपण केले जाते.