आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LJP Leaders Whats App Posted Pornographic Photos Of BJP Minister Smriti Irani News In Marathi

WhatsAppवर स्मृती इराणींचा अश्लील फोटो, \'लोजप\'च्या नेत्याविरुद्ध FIR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: स्मृती इराणी आणि लोक जनशक्ति पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान)
समस्तीपूर (बिहार)- केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री स्मृती इराणींचा एक मॉर्फ्ड अश्लील फोटो वॉट्सऐपवर सर्कुलेट झाल्याने एकच खळवळ उडाली आहे. याप्रकरणी लोक जनशक्ती पक्षाच्या (लोजप) एका नेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. समस्तीपूरचे लोजपचे शहराध्यक्ष उमाशंकर मिश्रा यांचे हे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी पोलिस लोजपच्या अनेक नेत्यांची कसून चौकशी करत आहेत.
समस्तीपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'दोस्ती' नामक वॉट्सऐप ग्रुपवर स्मृती इराणी यांचा एक मॉर्फ्ड अश्लील फोटो सर्कुलेट होत आहे. या ग्रुपचा मॉडरेटर लोक जनशक्ती पक्षाचा नेता रवींद्र कुमार सिंह आहे. परंतु, उमाशंकर मिश्रा यांनी आपल्या मोबाइलवरून हा फोटो 'दोस्ती' ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने पोलिसांसमोर पुरावा म्हणून उमाशंकर मिश्रा यांच्या मोबाइलवरून शेअर करण्‍यात आलेला फोटा सादर केला आहे. सायबर क्राइम सेल याप्रकरणी चौकशी करत आहे.
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मॉर्फ्ड अश्लील फोटो सोशल मीडियात शेअर करून त्यांची प्रत‍िमा मलिन करण्याचे कारस्थान सुरु आहे. लोजपचे प्रमुख रामविलास पासवान यांनी आरोपी उमाशंकर मिश्रा याला पक्षातून निलंब‍ित करावे, अशी मागणी राजीव रंजन यांनी केली आहे.
दरम्यान, उमाशंकर मिश्रा यांनी भाजपचे आरोप फेटाळले आहे. लोजपच्या शहर कार्यालयात दररोज अनेक लोक येतात. भाजप आणि लोजपमधील युतीत फूट पाडण्याचा कोणी तरी प्रयत्न करत आहे. यासाठी आरोपीने माझ्या मोबाइल क्रमांकाचा दुरुपयोग केल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.