आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज झालेल्या संघाने लावाला \'बॅन\', माध्यमांशी बोलणार नाहीत अडवाणी ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तिकीट वाटपावरुन झालेल्या वादामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर नाराज आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ही नाराजी दिसून आली आहे. संघाचे मुखपत्र पांचजन्य आणि ऑर्गनायझरच्या रि-लॉन्चिंग कार्यक्रमात अडवाणी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते. मात्र, दोघांमध्ये एकदाही बोलचाल झाली नाही.
संघात अडवाणींची पत घसरु लागली
- संघाच्या मुखपत्राच्या रि-लिन्चिंग कार्यक्रमात सरसंघ चालक भागवत आणि भाजप नेते अडवाणी उपस्थित होते. भागवत मंचावर होते, तर अडवाणी मंचासमोरील पहिल्या रांगेत बसलेले होते.
- अडवाणींना मंचासमोरील पहिल्या रांगेत स्थान मिळाले असले, तरी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना फार महत्त्व दिले नाही. मोहन भागवत त्यांच्यापासून अंतर राखूनच राहिले.
- या कार्यक्रमात अडवाणी भाजपच्या तिस-या फळीतील नेत्यासोबत बसून होते.
- मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून भाजपमध्ये होत असलेले परिवर्तन सहजतने स्विकारण्याचा त्यांना सल्ला दिला.
- कार्यक्रमानंतर माध्यमांनी अडवाणींची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांना असे करण्यास नकार दिला. त्यानंतर ते शांतपणे तेथून निघून गेले.
अडवाणींच्या कार्यालयातून मिळाला दुजोरा
दिव्य मराठी डॉट कॉमच्या प्रतिनिधीने अडवाणींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्या कार्यालयातील खासगी सचिवांनी ते बोलणार नसल्याचे सांगितले. अडवाणींची माध्यमांशी बोलण्याची इच्छा नसल्याचे ते म्हणाले.
पक्षाकडून अडवाणींच्या बोलण्यावर बंदी ?
- संघाच्या कार्यक्रमात अडवाणींची उपस्थिती नसल्यातच जमा होती. त्यांना त्या कार्यक्रमात कोणतेही महत्त्व दिले गेले नाही. माध्यमांशी बोलण्यासही संघ स्वयंसेवकांनी त्यांना रोखले. यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे, की संघाकडून अडवाणींना माध्यमांशी बोलण्याची बंदी घालण्यात आली आहे का?
- संघ आणि पक्षातील सुत्रांकडूनही अशी माहिती मिळत आहे, की संघाकडून अडवाणींना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे.
अडवाणींसोबत संघ अंतर ठेवून वागत आहे, त्यामुळे निर्माण झाले प्रश्न
- संघाला भीती आहे का, की अडवाणी निवडणुक काळात तिकीट वाटपाप्रमाणे इतर वादांना आमंत्रण देतील.
- लोकसभा तिकीट वाटपाच्या वादानंतर अडवाणी पु्न्हा एकदा संघाच्या निशाण्यावर आले आहेत का.
- मोहन भागवत यांनी अडवाणींची भेट टाळून स्पष्ट संकेत दिले आहेत, की भाजप प्रमाणेच संघातही परिवर्तन होत आहे. अडवाणींनी हे परिवर्तन केवळ समजूनच घेतले नाही पाहिजे तर ते स्वाकरेल देखील पाहिजे.