आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LK Advani Says, Emergency Can Happen Again In India

देशात पुन्हा आणीबाणीची वेळ; अडवाणींच्या वक्तव्याने वादंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला २५ जून रोजी ४० वर्षे पूर्ण होत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या शक्ती सक्रिय होत असल्याने देशात पुन्हा आणीबाणीची स्थिती नाकारता येत नाही, असे म्हटले.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील अडवाणींच्या मुलाखतीने विरोधी पक्षांना सरकारवर टीकेसाठी आयते कोलीत मिळाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी मते नाेंदवली. पीएमओने अधिकार हाती घेतल्याचे पाहता सत्यता पटते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

वक्तव्य संस्थांच्या संदर्भात : भाजप
भाजपचे प्रवक्ते एम.जे. अकबर म्हणाले, मला वाटते की, अडवाणी हे व्यक्ती नव्हे तर संस्थांच्या संदर्भात बोलत असावेत. देशात आणीबाणीची स्थिती परतण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही.