आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • LK Advani Says Emergency Was A Mistake By Indira Gandhi, Rahul Or Sonia Must Apologise For That

आणीबाणीबाबतचे माझे वक्तव्य काँग्रेससाठी; अडवाणींचा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणीबाबत आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझे वक्तव्य ४० वर्षांपूर्वी २५ जून १९७५ ला आणीबाणी लावणाऱ्या काँग्रेससाठी होते. काँग्रेसने त्याबाबत कधीही खेद व्यक्त केला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यासाठी माफी मागावी,’ असे अडवाणी म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अडवाणी यांनी, ‘सध्याच्या काळात लोकशाही दडपणाऱ्या काही शक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे आणीबाणी लागू होण्याच्या शक्यतेचा कोणीही इन्कार करू शकत नाही,’ असे म्हटले होते. त्यावर टीकाही झाली होती. त्यानंतर शुक्रवारी अडवाणी यांनी माध्यमांशी यावक्तव्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘माझे वक्तव्य कोणत्याही व्यक्तीसाठी नव्हते. मी प्रत्येक प्रकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात आहे. राजकीय पक्षांच्या अहंकारातून हुकूमशाहीचा जन्म होतो. आजच्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींसारखे उदार असायला हवे.’

केजरीवालांसोबतची बैठक रद्द
अडवाणी यांनी आणीबाणीबाबत दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकेड भेटीची वे‌ळ मागितली होती. पण आपले पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. शनिवारी आणि रविवारी आपण दिल्लीबाहेर आहोत. त्यामुळे पुढील आठवड्यातच भेट होऊ शकेल, असे अडवाणी यांच्या कार्यालयातर्फे केजरीवाल यांना कळवण्यात आले. सूत्रांच्या मते, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी केजरीवाल अडवाणींना भेटू इच्छित होते.